1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (23:40 IST)

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

National Indian Military College
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ करीता 18 डिसेंबर 2021 रोजी प्रवेशपात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. देशातील व राज्यातील कोविड-19 ची सद्यस्थिती लक्षात घेता मुलांसाठी व मुलींसाठी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांनी बदल केला असून त्यास 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी मुलांसाठी 30 ऑक्टोबर तर मुलींसाठी 15 नोव्हेंबर 2021 अशी मुदत देण्यात आली होती.
 
हा बदल लक्षात घेऊन या परीक्षेकरीता मुलांनी व मुलींनी आपले अर्ज आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, 17, डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे – 400001 या पत्त्यावर 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोहोचतील याची काळजी घेऊन पोस्टाने किंवा समक्ष जमा करावेत. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारले जाणार नाहीत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.