मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:08 IST)

पुण्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; 204 युवक-युवतींना मिळाली रोजगाराची संधी

jobs
पुणे शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला.
 यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हातभार लागावा ही अत्यंत समाधानाची बाब असून अशाच विविध उपक्रमांतून हा प्रयत्न यापुढेही सुरू असेल हा विश्वास यावेळी प्रशांत जगतापयांनी व्यक्त केला. या रोजगार मेळाव्यास शहरातील युवा वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत तब्बल २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख ,शहर उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, समन्वयक महेश हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.