शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (18:53 IST)

Railway Recruitment 2022: रेल्वेत बंपर नोकरी, आत्ताच अर्ज करा

West Central Railway Recruitment 2022 Notification:  रेल्वे भर्ती सेल, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ने स्टेशन मास्टर, स्टेशन कमर्शियल कम तिकीट आणि वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट लिपिक सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट ,ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्टच्या पदावर जीडीसीई  ने GDCE कोटा अंतर्गत टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनटीपीसी पदवीधर पदांसाठी एकूण 55 आणि एनटीपीसी 12वी उत्तीर्ण पदांसाठी 66 जागा उपलब्ध आहेत. सिंगल स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) त्यानंतर अॅप्टिट्यूड टेस्ट/टायपिंग स्किल टेस्ट (जेथे लागू असेल तिथे) असेल. 
 
या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे. 
 
पात्रता-
 स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. तर  कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12 वी पास असावा.
 
वयो मर्यादा-
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 वर्षांवरून 42 वर्षे ठेवण्यात आली आहे. 
 ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे 
 एससी एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे ठेवण्यात आले आहेत. 
 
पगार -
 स्टेशन मास्टर पदासाठी दरमहा 35400 रुपये, 
वरिष्ठ व्यावसायिक कम तिकीट लिपिक पदासाठी 29200 रुपये 
वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट या पदासाठी 29200 रुपये
व्यावसायिक कम तिकीट लिपिक पदासाठी 21700 रुपये
 लेखा लिपिक सह टंकलेखक पदासाठी 19900 रुपये
 कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक पदासाठी 19900 रुपये प्रति महिना.
 
रेल्वे भरती प्रक्रिया-
सिंगल स्टेज संगणक आधारित चाचणी (CBT)
अभियोग्यता चाचणी / टायपिंग कौशल्य चाचणी (जेथे लागू असेल तेथे)
दस्तऐवज पडताळणी / वैद्यकीय परीक्षा