शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (16:53 IST)

Indian Railway Recruitment 2022 : रेल्वेत 5 हजारांहून अधिक पदांवर बंपर भरती, त्वरा अर्ज करा

Northeast Frontier Railway Recruitment 2022 :रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं (Northeast Frontier Railway) शिकाऊ पदांवर (अपरेंटिस) पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या (Northeast Frontier Railway) अधिकृत वेबसाईटवर https://nfr.indianrailways.gov.in/जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी 30 जून शेवटची तारीख आहे.
 
पदे -
भारतीय रेल्वेनं या भरती मोहिमेअंतर्गत, कटिहार (KIR) आणि टीडीएच (TDH) कार्यशाळेसाठी 919 पदे, अलीपुरद्वारसाठी (KIR) 522 पदे, रंगिया येथे (RNY) 551 पदे, लुमडिंगसाठी 1140 पदे, तिनसुकियासाठी 547 पदे, न्यू बोंगाईगाव, आणि दिब्रुगड कार्यशाळा कार्यशाळेसाठी 1,110 पदे, 847 पदे भरण्यात येणार आहेत. 
 
पात्रता- 
या रेल्वे भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) असणं आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा-
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं.
 
निवड प्रक्रिया- 
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल 
 
अर्ज फी- 
 उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 100 रुपयांचे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भराव लागणार.