सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (13:10 IST)

भारतीय रेल्वेने 372 गाड्या रद्द केल्या

train
रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच 30 मे 2022 रोजी भारतीय रेल्वेने 372 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या रद्द झालेल्या बहुतांश गाड्यांमध्ये पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्टेशनवर जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या ट्रेनची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जर तुम्ही वेबसाइट किंवा काउंटरवरून तिकीट बुक केले असेल, तर तुमच्या भाड्याचा संपूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाईल.
 
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी काही ना काही करत असते. अशा परिस्थितीत ट्रेन रद्द होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. रेल्वे रुळ, डब्यांची दुरुस्ती, रेल्वे अपडेट करणे, जेणे करून प्रवाशांना त्रास होऊ नये. असे काम सुरू असते. यामुळे अनेक वेळा गाड्या रद्द करून मार्ग बदलावा लागतो. कधीकधी खराब हवामानामुळे गाड्या रद्द होतात किंवा गस्य येण्यास उशीर होतो.
 
30 मे 2022 रोजी, रेल्वेने एकूण 372 गाड्या रद्द केल्या आहेत. तर 24 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 11 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्या ट्रेनची स्थिती एकदा नक्की तपासा नाहीतर  अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
 
कसे तपासायचे
रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी, तुम्हाला enquiry.indianrail.gov.in/mntes ला भेट द्यावी लागेल.
येथे Exceptional Trains चा पर्याय निवडा. आता तुम्ही रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता.