1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (08:29 IST)

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

Punjabi singer Sidhu Musawala shot dead पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची मानसाच्या जवाहरके गावात भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गोळीबारात मुसेवाला यांना प्राण गमवावे लागले तर त्यांचे दोन साथीदार जखमी झाले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती. मुसेवाला यांच्याकडे पूर्वी 8 ते 10 बंदूकधारी होते. मान सरकारने त्यांना सोबत फक्त 2 बंदूकधारी दिले  होते. प्राथमिक माहितीनुसार, सिद्धू मूसवाला आपल्या साथीदारांसह कारमधून जात होते. काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घरापासून 5 किमी अंतरावर गेल्यावरच मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावेळी मुसेवाला स्वतः वाहन चालवत होते.
 
सिद्धू मुसेवाला यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक मानसा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंगला यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मुसेवाला यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव करणारे विजय सिंगला राज्याचे आरोग्यमंत्री झाले. नुकतेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदावरून हटवले होते. सिद्धू मुसेवाला यांनी कालच त्यांच्या वकिलाशी चर्चा केली. ज्यामध्ये त्याने जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. मुसेवाला म्हणाले होते की, पंजाब सरकारने कोणतीही सूचना न देता त्यांची सुरक्षा अचानक कमी केली आहे. त्यामुळे यासाठी आणखी काही व्यवस्था करावी लागणार आहे.