1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified रविवार, 20 मार्च 2022 (16:28 IST)

महाराष्ट्रात पॅरामेडिकल पदांसाठी भरती,लवकर अर्ज करा

महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती पॅरामेडिकल स्टाफसाठी आहे. याअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक( कौन्सलर), तंत्रज्ञ(टेक्नीशियन), प्रसूतीतज्ज्ञ(ऑब्सटेट्रिशियन), भूलतज्ज्ञ(एनेस्थिसिएस्ट) आदी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 87 पदांची भरती केली जाणार आहे.
 
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2022 आहे. अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात त्वरा अर्ज करा.
 
योग्य आणि पात्र उमेदवारांनी  महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी या वेबसाइटला भेट देऊ शकता. www.beed.gov.in 
 
या पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना पाहू शकता. यासाठी www.nrhm.maharashtra.gov.in ला भेट द्या.
 
वेतनमान - या पदांसाठी निवड झाली तर दरमहा 60 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपये वेतनमान मिळवू शकता. पदानुसार पगार वेगवेगळा असतो