रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2022 (12:48 IST)

भारतीय स्टेट बँकेत बंपर भरती

jobs
बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती जाणून घ्या-
 
जागा आणि पदे :
सिस्टम ऑफिसर : 07
कार्यकारी : 17
वरिष्ठ कार्यकारी : 12
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी : 01
उपाध्यक्ष आणि प्रमुख : 01
वरिष्ठ विशेष कार्यकारी : 11
व्यवस्थापक : 02
सल्लागार : 04
 
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची मुदत : 18 मे 2022
VP आणि Sr. स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी अर्ज करण्याची मुदत : 04 मे 2022
व्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी अर्ज करण्याची मुदत : 28 एप्रिल 2022
 
निवड प्रक्रिया : पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. ही गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. सिस्टम ऑफिसर या पदांसाठी व्यावसायिक ज्ञान चाचणी (150 गुणांपैकी) आणि मुलाखत (25 गुणांपैकी) गुण एकत्र करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार.
 
इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.