संबंधित माहिती
- Recruitment in the health department आरोग्य विभागात बंपर भरती!
- Career in Executive MBA Human Resource Management: एचआरएममध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार व्याप्ती जाणून घ्या
- ISRO Recruitment 2023 इस्रोमध्ये बंपर भरती
- Indian Navy Jobs 2023: नौदलात 372 जागांसाठी भरती
- भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती
SSC CHSL Recruitment 2023: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरती, त्वरा अर्ज करा
SSC CHSL Recruitment 2023:नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने CHSL भरती अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये 1600 हून अधिक पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत
उमेदवारांना नियोजित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या वतीने या भरतीद्वारे, ग्रुप सी पदांवर नियुक्त्या केल्या जातील. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. निवडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये निम्न विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांवर केल्या जातील.
9 मे पासून भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2023 आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. एकूण 1600 पदांवर भरतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे.
पात्रता
12वी पास असलेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. यासाठी ते उमेदवार देखील अर्ज करू शकतील जे बसणार आहेत किंवा 12वीची परीक्षा दिली आहेत.
वयोमर्यादा:
वयाची गणना01-08-2023 रोजी निश्चित केली आहे. 02-08-1996 च्या आधी आणि 01-08-2005 नंतर जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. नियमानुसार विविध श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
वेतनमान-
कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक - 19,900 - 63,200 रुपये प्रति महिना वेतनमान असेल.
डेटा एंट्री ऑपरेटर - 29,200 - 92,300 रुपये प्रति महिना वेतनमान असेल
आवश्यक कागदपत्रे -
बायोडाटा
दहावी च शैक्षणिक प्रमाण पत्र
बारावीच शैक्षणिक प्रमाण पत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय)
ओळखपत्र
आधार कार्ड
लायसन्स
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज कसा कराल -
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरhttps://ssc.nic.in/ जा.
- वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून सबमिट करा.
- फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
- अंतिम सबमिट करा आणि एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा
Edited by - Priya Dixit
