गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (12:39 IST)

हायड्रोथेरपीतील कारकीर्द

आजार बरे करण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपींचा वापर केला जातो. त्यापैकी एक म्हणजे हायड्रो किंवा वॉटर थेरेपी. हायड्रो थेरेपी हा फिजिओथेरेपी व्यायामाचा एक प्रकार आहे. रोग बरे करण्यासाठी किंवा आरोग्य राखण्यासाठी यात पाणी या माध्यमाचा वापर केला जातो. हायड्रो थेरेपी हा प्रकार भारतात नवा आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातल्या करिअरविषयी माहिती घेऊ या...
पात्रता
कोणत्याही शाखेतला पदवीधर हायड्रोथेरेपीमध्ये करिअर करू शकतो. हायड्राथेरेपीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही हायड्रोथेरेपीस्ट म्हणून काम करू शकता.
कौशल्य
पोहोण्याची कला अवगत असायला हवी. संवादकौशल्यं असणं गरजेचं आहे. रूग्णांना हाताळण्याची क्षमता हवी.
अभ्यासक्रम
अखिल भारतीय अल्टरनेटिव्ह मेडिसिन कौन्सिल, नैनितालतर्फे तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या विषयावरचे ऑनलाइन अभ्यासक्रम ही उपलब्ध आहेत. इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता, ऑल इंडिया पॅरा मेडिकल टेक्नॉलॉजी अॅण्ड अल्टरनेटिव्ह मेडिकल कौन्सिल, पंजाब या संस्थांनी दोन वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. सहा महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संधी
हायड्रोथेरेपिस्ट म्हणून तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये आपली सेवा देऊ शकता. लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे हायड्रो थेरेपीच्या माध्यमातून तुम्ही उत्तम करिअर घडवू शकता. पुरेशाअनुभवानंतर वैयक्तिक व्यवसायही सुरू करू नका. हॉस्पिटल्स, वेलनेस सेंटर, जीम, स्पा अशा ठिकाणी हायड्रोथेरेपिस्ट म्हणून काम करता येईल.