शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (15:14 IST)

वुलन चे कपडे धुतांना या चुका करणे टाळा, या मुळे कपड्यांची चमक फिकट होऊ शकते

वुलनचे कपडे व्यवस्थित स्टाईल करण्या बरोबरच ते धुणेही खूप महत्त्वाचे आहे. वुलनचे कपडे हळुवार पद्धतीने स्वच्छ केले नाहीत तर ते खराब होतात. अशा परिस्थितीत ते कपडे धुताना अनेक खबरदारी घ्यावी लागते. जर ते व्यवस्थित धुतले गेले नाहीत तर ते त्यांचा आकार बदलतात. कधी कधी ते परिधान केल्यावर खूप रफ दिसतात. काहीवेळा महागडे स्वेटर त्यामुळे खराब होतात आणि त्यांचा मऊपणा आणि चमक नाहीशी होते. बहुतेकदा असे घडते जेव्हा ते धुताना योग्यरित्या स्वच्छ केले जात नाहीत. अशा परिस्थितीत जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे वुलनचे कपडे खराब होतात. 
1 मशीन जास्त भरणे - जरी वुलनचे कपडे हाताने आणि मशिनने सहज धुतले जाऊ शकतात, परंतु मशीनमध्ये वुलनचे कपडे धुताना मशीनीत जास्त कपडे भरू नये. याची काळजी घ्यावी लागेल. आपण एकाच वेळी सर्व कपडे धुण्याचा प्रयत्न करत असाल तर असे करू नका. असे केल्याने कपडे नीट स्वच्छ तर होणार नाही . शिवाय ते खराबही होतील. 
 
2 जास्त धुणे - अनेकांना अशी सवय असते की ते कपडे एकदा घातल्यानंतर धुतात. मात्र, ही सवय उन्हाळ्यात खूप चांगली असते. पण जर हिवाळ्यात वुलनचे  कपडे जास्त धुतले तर ते खराब होऊ शकतात. त्याऐवजी, वुलनचे कपडे घातल्यानंतर कपड्यांना सूर्यप्रकाशात ठेवा आणि ते पुन्हा परिधान करण्यात काहीसा अंतर देऊ शकता. 
 
3) गरम पाण्यात धुणे -जर आपल्याला असे वाटत असेल की वुलनचे कपडे स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी हा एक चांगला पर्याय आहे, तर आम्ही सांगतो की खूप गरम पाण्यात कपडे धुतल्याने त्यांची शेल्फ लाइफ कमी होऊ शकते. यासाठी  फक्त सामान्य पाणी वापरा.