रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (14:58 IST)

Beauty benefits of buttermilk : ब्युटी रूटीनमध्ये ताक समाविष्ट करा, ताकाचे फायदे जाणून घ्या

Beauty benefits of buttermilk : ताक हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे, लोक सहसा ताक दुपारच्या जेवणात खायला घेतात . हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, ताकाने त्वचा आणि केसांचे फायदे देखील होते. टॅनिंगपासून ते सनबर्न, कोंडा पासून ते केसांच्या रुक्षपणाची समस्या दूर होते. तुम्ही ब्युटी रुटीनमध्ये अनेक प्रकारे याचा समावेश करू शकता आणि नैसर्गिक पद्धतीने तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेऊ शकता.चला तर मग ताकाचे सौंदर्यवर्धक फायदे जाणून घेऊ या. 
 
1 त्वचा स्वच्छ करते -
ताक त्वचेच्या पृष्ठभागावरील घाण साफ करून बॅक्टेरियाच्या वाढीवर नियंत्रण ठेवतो. यासाठी एका भांड्यात 3 चमचे ताक, 1 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचे बदाम तेल मिक्स करा. आता त्यात थोडे गुलाब पाणी घालून मिक्स करा. आता या मिश्रणात कापसाचा गोळा बुडवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. शेवटी, पाण्याच्या मदतीने ते स्वच्छ करा.
 
2 सनटॅन काढते-
जर सनटॅनमुळे त्वचेला असमान टोनचा त्रास होत असेल तर ताकाचा वापर करा. या मध्ये लॅक्टिक ऍसिड समृद्ध असल्याने, ते नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून कार्य करतो. त्यामुळे तुमची त्वचा इव्हनटोन बनते. यासाठी ताक, मध आणि ताजे कोरफडीचे जेल घालून मऊ पेस्ट बनवा.आता या मिश्रणात गुलाबजल टाका आणि त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. साधारण 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा.
 
3 तरुण त्वचा मिळते -
ताकामध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते जी मुक्त रॅडिकल्सला काढून टाकते . तसेच, त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि एजिंग कमी करते. यासाठी मिक्सरमध्ये 2 चमचे ताक, एक मॅश केलेले केळे आणि एक चमचा मध घालून चांगले मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवर आणि चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर जेंटल क्लिंझरने त्वचा स्वच्छ करा.
 
4 कोंडा दूर करते -
 कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ताक वापरणे योग्य ठरू शकते. हे तुमच्या स्कॅल्प  ला हायड्रेशन देऊन कोंड्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. ते वापरण्यासाठी एका वाडग्यात ताक, बेसन आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा . आता ही पेस्ट तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांच्या मुळांवर लावा. आता हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर 30 मिनिटांनंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. कोंड्याचा त्रास नाहीसा होईल. 

Edited By - Priya Dixit