बूट निवडताना...
जास्त घट्ट बूट घातल्याने पाय दुखणं, नखं वाढणं, नखं तुटणं यांसारख्या समस्या उद्भवतात. पायांचा आकार बदलण्यासोबतच बोटांची हाडं वाकटी होऊ शकतात.
* मिनिमॉलिस्ट बूटांमध्ये पायांच्या आधारासाठी टाचांपाशी फुगवटा नसतो. यामुळे पायांना जखम होऊ शकते. अशा बुटांमुळे स्नायू दुखावण्याची शक्यता वाढते.
* हेवी ट्रेकर्स बुटांची ग्रिप चांगली असली तरी वजन जास्त असतं. वजनदार ट्रेकर्समुळे पाय दुखतात. पायांमध्ये थकव जाणवू शकतो. त्यामुळे कमी वजनाचे बुट वापरायला हवेत.
* अतिघट्ट बुटांमध्ये पायांच्या सांध्यांची हालचाल मोकळेपणाने होत नाही. यामुळे पाय दुखतात.
* सपाट चप्पल किंवा बुटांमध्ये पायांना आधार मिळत नाही. सपाट पादत्राणं बराच काळपर्यंत घातल्यास पाठदुखी, गुडघेदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
* स्लीपर किंवा फ्लिपफ्लॉप चपलांमध्ये पाय उघडे रहात असल्याने जखम होण्याची शक्यता वाढते.
* घट्ट किंवा छोट्या आकराच्या बुटांमुळे भेगा पडणं, सांध्यावर ताण येण्यासारख्या समस्या उद्भवतात.