शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

कसा घ्याल 'ब्रा'चा माप

जर आपण ब्रा खरेदी करायला जात असाल आणि आपल्या स्तनाचा माप बदलून गेला असेल किंवा इतर कोणता ब्रँड घेत असाल तर अंदाज गडबडणे साहजिक आहे. म्हणून ब्रा खरेदी करण्यापूर्वी घरी व्यवस्थित माप घेऊन बाहेर पडला तर योग्य मापाची ब्रा घेणे सोपे जाईल. खाली दिलेल्या टिप्सने आपल्याला योग्य कपसाइज ब्रा खरेदी करता येईल. स्तन आणि ब्राचा साइज जाणून घेणे आवश्यक आहे कारण विभिन्न ब्रँडेचे माप भिन्न असतात, कप साइजचा माप वेगळा असतो जो आपल्या स्तनाला सुंदर आणि सुडौल दिसण्याचसाठी आवश्यक आहे.
 
ट्रायल घेता येत असेल तर सर्व प्रश्नच सुटतील परंतू हे शक्य नसल्यास घरीच ब्राचा साइज मापून घ्या. खालील दिलेल्या स्टेप्सने आपण माप घेऊ शकता.
स्तनाचा आकार मापण्यासाठी: आपल्या ब्रेस्टच्या खाली टेलरिंग टेप गुंडाळा. स्तनाच्या अगदी खालून सुरू करून पाठ कव्हर करत मापा. टेप जुळल्यावर जो नंबर दिसत असेल त्यात 5 जोडा. उदाहरणासाठी आपल्या स्तनाचा टेपप्रमाणे माप 27 असल्यास त्यात 5 जोडून द्या, अर्थात 32 हा आपला ब्रा साइज आहे. 
 
ब्रा कप साइज मापण्यासाठी: आता स्तनाच्या सर्वात उभारलेल्या भागाला मापावं लागेल ज्याला बस्टलाइन असे म्हणतात. हा माप घेताना आपले हात सरळ असले पाहिजे. आपल्या बस्टलाइनचा माप आपल्या ब्रा चेस्ट साइजच्या मापापेक्षा अधिक असेल. आपल्या ब्रा चेस्ट साइज माप आणि बस्टलाइन मापाचा अंतर हाच आपला ब्रा कप साइज आहे.