1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
  4. Promise Day 2026 Wishes in Marathi

Promise Day 2026 Wishes in Marathi प्रॉमिस डे शुभेच्छा संदेश मराठी

Promise Day 2026 Wishes in Marathi
शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते… 
आज तुला एकच वचन 
कायम तुझ्या सोबत, प्रत्येक क्षणी.
 
सुखात आनंदाने आणि दुःखात धीर देत, 
तुझा हात कधीच सोडणार नाही, हे माझं प्रॉमिस. 
 
नात्यात परिपूर्णता नाही, 
पण प्रामाणिक प्रयत्न असतील… 
तेच आजचं वचन
 
रुसवे-फुगवे येतील, 
मतभेदही होतील; 
पण नातं कधीच तुटू देणार नाही, 
हे वचन
 
आयुष्य कितीही बदलो, 
माझं तुझ्यावरचं प्रेम मात्र कायम तसंच राहील
हेच माझं प्रॉमिस.
 
प्रत्येक स्वप्नात, 
प्रत्येक यशात आणि 
प्रत्येक अपयशात 
तुझ्या पाठीशी उभा राहीन
 
शब्द कमी पडले तरी भावना कधी कमी पडू देणार नाही
हे आज तुला दिलेलं वचन
 
नातं जपण्यासाठी रोज नव्याने प्रयत्न करीन,
कारण तू माझ्यासाठी खास आहेस
 
आयुष्याच्या गर्दीतही तुला कधी एकटं वाटू देणार नाही, 
हे मनापासूनचं प्रॉमिस
 
आज नाही, उद्याही नाही… 
तर कायमच तुझा विश्वास जपेन,
हे वचन
 
प्रेम म्हणजे फक्त भावना नाही,
ती जबाबदारी आहे
आणि ती मी आनंदाने स्वीकारतो
 
हातात हात, मनात विश्वास आणि नात्यात प्रेम
हे तिन्ही जपण्याचं आजचं वचन