सण कोणताही असो वा घरगुती सभारंभ, प्रत्येक स्त्रीला 'खास' दिसावसं वाटतं. पार्लरमध्ये तासनतास खर्च करण्यापेक्षा, तुम्ही स्वतःच्या हाताने केलेला मेकअप तुम्हाला अधिक आत्मविश्वास देतो. चला तर मग, जाणून घेऊया ५ सोप्या स्टेप्स!
स्टेप १: त्वचेची तयारी-
मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असणे आवश्यक आहे.
क्लिंजिंग: चेहरा माईल्ड फेसवॉशने धुवून घ्या.
टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग: त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनर आणि तुमच्या त्वचेनुसार चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे मेकअप काळपट पडत नाही.
प्राईमर : मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी आणि चेहऱ्यावरील पोअर्स लपवण्यासाठी 'प्राईमर' लावायला विसरू नका.
स्टेप २: बेस मेकअप-
नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी बेस हलका ठेवा.
फाउंडेशन/BB क्रीम: तुमच्या स्किन टोनशी जुळणारे फाउंडेशन ठिपक्यांच्या स्वरूपात चेहऱ्यावर लावा आणि ब्युटी ब्लेंडरने नीट ब्लेंड करा.
कन्सीलर: डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा डाग लपवण्यासाठी कन्सीलर वापरा.
लूज पावडर: मेकअप सेट करण्यासाठी हलकी कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावा, जेणेकरून चेहरा तेलकट दिसणार नाही.
स्टेप ३: डोळ्यांचे सौंदर्य-
सणांच्या वेळी डोळ्यांचा मेकअप हायलाईट करणे महत्त्वाचे असते.
आयशॅडो: तुमच्या कपड्यांच्या रंगाशी जुळणारा किंवा 'गोल्डन/न्यूड' शेडचा आयशॅडो वापरा.
काजळ आणि लायनर: डोळ्यांना गडद काजळ आणि आयलाईनर लावून डोळे मोठे आणि आकर्षक बनवा.
मस्करा: पापण्यांना व्हॉल्यूम देण्यासाठी मस्करा लावा.
स्टेप ४: ब्लश आणि ग्लो किंवा हायलाईटर-
ब्लश: गालांवर हलका गुलाबी किंवा पीच रंगाचा ब्लश लावा, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक टवटवीतपणा येईल.
हायलाईटर: नाकाचे टोक, गालांची हाडे आणि कपाळाच्या मध्यभागी हायलाईटर लावा. यामुळे फोटोंमध्ये तुमचा चेहरा चमकतो.
स्टेप ५: ओठांची जादू-
लिपस्टिक: सणासुदीला लाल, मरून किंवा डार्क पिंक सारखे गडद रंग छान दिसतात. जर डोळ्यांचा मेकअप गडद असेल, तर ओठांना न्यूड शेडची लिपस्टिक लावा.
टीप: लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनरने आउटलाईन करा, जेणेकरून ती पसरणार नाही.
काही खास टिप्स-
मेकअप फिक्सर: शेवटी मेकअप फिक्सर स्प्रे करा, जेणेकरून घाम आला तरी मेकअप खराब होणार नाही.
दागिने आणि हेअरस्टाईल: मेकअप पूर्ण झाल्यावर साडी किंवा ड्रेसवर साजेसे दागिने आणि एखादी छान अंबाडा किंवा कर्ल्स हेअरस्टाईल करा.
पाणी भरपूर प्या: मेकअपच्या आधी आणि नंतर त्वचा हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.