सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:45 IST)

लेगिंग्स सह हे फूटवेयर घाला

आपल्याला लॅगिंग्स सह कोणते फुटवेयर घालायचे आहे हे समजत नसेल तर आपली ही अडचण आम्ही दूर करू शकतो. आपण  कोणते फुटवेयर घालू शकता. हे सांगत आहोत.   
हल्ली लॅगिंग्स चा वापर जास्त वाढत आहे. लेगिंग्स आपण कुर्ती, टॉप, शर्ट घालू शकता. लेगिंग्स भारतीय पोशाखावर घाला किंवा पाश्चात्य पोशाखावर घाला सर्वांवर चांगली दिसते. परंतु गोष्ट जेव्हा फुटवेयर ची येते तेव्हा समजत नाही की काय घालावं. बऱ्याच वेळा एकाच प्रकारचे फुटवेयर प्रत्येक कपड्यांसह घालतो. या साठी योग्य प्रकाराचे आरामदायक फुटवेयर परिधान करणे चांगले असणार. चला तर मग जाणून घेऊ या की लॅगिंग्स सह कोणते फुटवेयर निवडावं जे आपल्यासाठी स्टायलिश आणि आरामदायी असतील.
 
1 wedges फुटवेयर -
 जर आपल्याला असं वाटत आहे की लेगिंग्स सह आपण भारतीय पोशाख घालत आहात तर wedges फुटवेयर घालू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर आपण काळे wedges घेता तर हे आरामदायक फुटवेयर आहे. हे सर्व ड्रेससह घालू शकता. कॅज्युअल wedges फुटवेयर
लेगिंग्सह परिधान करा ही शॉर्ट कुर्ती, लॉन्ग कुर्ती किंवा शर्ट वर देखील छान दिसेल.  
 
टीप: wedges फुटवेयर आपण काळे किंवा तपकिरी घेल्यास सर्व कपड्यांसह चांगले दिसणार. हे घालून आपण उंच दिसाल.
 
2 स्नीकर्स -
जर आपल्याला असे वाटत आहे की लेगिंग्सची एखाद्या वेस्टर्न कपड्यांसह जुळवणी करायचे असेल म्हणजे लॉंग शर्ट किंवा टी शर्ट किंवा टॉप सह. आपण आरामदायी वाटणारे वॉकिंग शूज वापरू शकता. हे वेग-वेगळ्या रंगात आणि कम्फर्ट च्या हिशोबाने येतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या आवडीनुसार स्नीकर्स खरेदी करू शकता. जे आपण वर्कआउट साठी स्नीकर्स घेत आहात  जसे की संध्याकाळच्या वॉक साठी तर स्नीकर्स सर्वात योग्य असतील. विशेषतः वर्कआउटच्या आऊटफिट मध्ये लेगिंग्सह शूज चांगले असतात.
 
टीप : पांढरे स्नीकर्स नेहमी प्रत्येक रंगांसह चांगले दिसतात. जर आपण लेगिंग्स सह नेहमी लॉन्ग शर्ट परिधान करता तर पांढरे किंवा न्यूडबेस रंगाचे स्नीकर्स निवडा.  
 
3 सॅंडल- 
लेगिंग्सह वेस्टर्न किंवा इंडियन आऊटफिट घाला परंतु त्यांच्या सह ब्लॉक हिल्सवाले सॅंडल चांगले वाटू शकतात. एखाद्या पार्टीमध्ये जात असताना खास करून पार्टी आऊटफिट्ससह लेगिंग्स घालत असताना त्यावर ब्लॉक हिल्स छान दिसेल. अशा प्रकारची हिल्स आरामदायक असते. जर आपण लेगिंग्सच्या व्यतिरिक्त काहीही वेगळे घालत असाल जसे की वेस्टर्न आऊटफिट. त्याच्या सह देखील हिल्स चांगले दिसतील.
 
टीप :  सॅंडलच्या हिल्स ची निवड करताना नेहमी कम्फर्ट लक्षात ठेवा. अन्यथा कम्फर्टेबल हिल्स नसल्यानं समस्या उद्भवू शकतात.   
 
4 लोफर- 
हे फार आरामदायक असतात आणि प्रत्येक प्रकारच्या कपड्यांसह हे घातले जाऊ शकतात. आपण आपल्यासाठी उत्कृष्ट लोफर फुटवेयर देखील विकत घेऊ शकता. हे लेगिंग्सह वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही प्रकारच्या लुकसह जुळवू शकता.
 
टीप: सर्वात जास्त उत्कृष्ट आणि आरामदायी लोफरचं असू शकतात. जर आपण हे डेनिम लूक मध्ये घेता तर फिट आणि फ्लेयर ड्रेस सह लेगिंग्स पर्यंत आपण चांगले दिसाल.
 
5 फ्लॅट सॅंडल- 
जर आपल्याला हे समजत नसेल की कोणते फुटवेयर लेगिंग्ससह घालावे तर या साठी आपण फ्लॅट सॅन्डल ची निवड करू शकता. ही कोणत्याही लेगिंग्स सह चांगली दिसेल. जर हाफ लेगिंग्स आहे तर आपण दोरीचे सॅंडल देखील घालू शकता. या साठी योग्य आहे की फ्लॅट सॅंडल निवडा. एक फ्लॅट सॅंडल बऱ्याच प्रकारच्या आऊटफिटसह चांगले दिसतील. आपण या साठी न्यूट्रल रंगाची निवड करू शकता.  
 
टीप: फ्लॅट सॅंडल नेहमी काळे घेण्या ऐवजी न्यूट्रल रंग निवडा.  
 
6 पंप हिल्स -
बेली शेपच्या फुटवेयर सह लहान पंप हिल्स चांगले दिसतात आणि जर आपण त्या लोकांमध्ये आहात ज्यांना हिल्स मुळे त्रास होतो. तर आपण विशेषतः अशा प्रकारची हिल्स वापरू शकता. ही जास्त मोठी नसते आणि पायाला देखील आराम मिळतो.  
 
टीप : सोनेरी किंवा चमकीली पंप हिल्स नेहमी पार्टीसाठी परिपूर्ण असतात..