शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (19:18 IST)

व्हॅलेंटाइन डे विशेष : मुलांना देखणे आणि हँडसम दिसायचे असल्यास या फॅशन टिप्स अवलंबवा

व्हॅलेंटाइन डे च्या  दिवशी फक्त  मुलींनीच तयार व्हावं असं काही नाही.डेटिंग ला जायचे असल्यास मुलांनी देखील नीट नेटके तयार होऊन जायला पाहिजे जेणे करून ते आपल्या प्रेयसी ला प्रभावित करू शकतील. यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला खास दिसून आपल्या प्रेयसीला आपल्या बेस्ट लुक ने प्रभावित करण्यासाठी या टिप्स अवलंबवा आणि या खास दिवसाला अधिक खास बनवा.
 
* जाकीट -  
स्वतःला देखणे दिसायचे असल्यास जॅकेट किंवा जाकीट हे एक उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यात हे आपल्याला उष्ण ठेवेल आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला मोहक ठरवेल. तसेच आपण आपले लुक अधिक खास बनवू शकाल.
 
* डेनिम शर्ट -
काय घालावे आणि काय नाही हाच प्रश्न पडला आहे तर डेनिमची स्लिम फिट शर्ट घाला. हे आपल्याला मोहक आणि आकर्षक दिसण्यात मदत करेल. याच्या सह वेलफिटेड ट्राउझर घाला. आपला देखणा लुक आपल्या प्रेयसीला नक्कीच प्रभावित करेल.
 
* ब्लेझर -
जर आपल्या प्रेयसीला आपला कॅज्युअल लुक आवडतो तर डेट नाइट साठी आपण ह्याचा प्रयत्न करू शकता.या शानदार ब्लेझरला डेनिम जीन्स आणि टी शर्ट सह जुळवा. आपले सेमी कॅज्युअल लुक बघून ती नक्कीच प्रभावित होईल.
 
* शर्ट -
मुलांना देखणे आणि आकर्षक दिसण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे एक उत्तम शर्ट. कारण बऱ्याच मुलींना मुले क्रिस्प कॉलर असलेल्या शर्ट मध्ये आवडतात टीशर्टमध्ये नाही. जर आपण देखील काहीही नवीन प्रयत्न करण्याच्या मूडमध्ये नाही तर एक क्रिस्प शर्ट घालून आपल्या प्रेयसीला सहज प्रभावित करू शकता. या सर्व कपड्यांसह योग्य पादत्राणे जुळविणे फार महत्त्वाचे आहे. जेणे करून आपला संपूर्ण लुक छान, प्रभावी आणि  देखणा दिसेल.