शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

'एंजॉय' करा पावसाळा...

रिमझिम पावसात खेळायला कुणाला आवडत नाही. पण पावसामुळे बराच त्रासही सहन करावा लागतो. थोडीशी सावधगिरी बाळगली तर या पावसाळ्याचाही आनंद लुटू शकता. पाऊस पडला म्हणजे बाहेर जाता येत नाही, अशी तक्रारही करू नका. कारण खाली दिलेल्या टिप्सचे पालन केले तर नक्कीच तुम्ही पाऊस 'एंजॉय' करू शकता.

सर्वांत आधी एक चांगला रेनकोट, छत्री आणि वॉटरप्रूफ बूट हवेत. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पॉकेट मनीतून थोडीशी बचत करणे गरजेचे आहे. तुमच्याजवळ आधीपासूनच हे सामान असेल तर त्याच्या दुरूस्तीची गरज नाही ना? हे पहा. दर वर्षी काम झाल्यावर हे सामान नीट ठेवल्यास या वस्तू शोधण्यात वेळ जाणार नाही आणि संतापसुद्धा होणार नाही.

बॅग किंवा पर्स वॉटरप्रूफ असणे जरूरी आहे. कारण त्यामुळे पुस्तके, पैसे, मोबाईल व लहानसहान मेकअपचे सामान खराब होणार नाही.

या मोसमात मेकअप कमी केला तरी चालेल आणि करायचा असेल तर वॉटरप्रूफ करायला हवा.

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालणे टाळावे. सिंथेटिक कपडे लवकर वाळतात म्हणून ते घालावे. या दिवसांत तुमच्या बॅगमध्ये कपड्यांचा एक जोड हवा.

कपड्यांच्या कपाटाला बुरशीपासून वाचविण्यासाठी कागदाच्या खाली लिंबाचे पाने ठेवायला पाहिजे.

बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. घराबाहेर जास्त वेळ घालवायचा असेल तर बिस्किट, फ्रेश फ्रूट, ज्यूस यांना प्राधान्य द्या.

गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.गाडी नियंत्रित गतीने चालवावी. खासकरून बिनगियरवाल्या गाड्या पाण्यात घसरण्याची शक्यता असते.

गाड्यांची सर्विसिंग पावसाच्या आधीच करून घ्यावी. नाहीतर रस्त्यात कुठेही गाडी बंद पडली तर त्रास होतो.

पावसात भिजल्यानंतर एकदा घरी जाऊन परत अंघोळ करायला हवी.
ही थोडीशी सावधगिरी बाळगली तर पावसासोबत गरमा गरम भज्यांचा आस्वाद घेऊ शकता नाही का?