शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

दागिन्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

* कोणत्या पेहरावासाठी किंवा साडीसाठी तुम्हाला नेमके कोणते दागिने घ्यायचे आहेत, ते खरेदीपूर्वी ध्यानात घ्या. तसेच त्या दागिन्यांची पुनर्विक्रीची किंमतही लक्षात घ्या.
 
* रेडियमचे पॉलिश केलेले सोन्याचे दागिने म्हणजेच व्हाइट गोल्ड दागिने भपकेबाज दिसत नाहीत. सणसमारंभ तसेच पार्टीजसाठी हे दागिने उत्तम असतात. 
 
* हिर्‍याचे दागिने घेताना कलर, क्लॅरिटी आणि कॅरेट या गोष्टी ध्यानात घ्याव्यात.
* वेगळे काही ट्राय करायचे असेल, तर आऊटफिटवर नेकलाइन, स्लीव्हज, बॉर्डर वा बेल्टवर स्टोनवर्क, क्रिस्टल वर्क केल्यान पेहरावाला वेगळा लूक येतो. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने एकाच वेळी घालू नयेत.
 
* सोने, चांदी, इमिटेशन ज्वेलरी-चांदी यांचे कॉम्बिनेशन चांगले दिसत नाही. सोन्याच्या दागिन्यांसोबत हिरे, मौल्यवान खडे तसेच ज्वेलरी वापरू नये. 
 
* आज दागिना हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग मानला जातो, त्यामुळे ठसठशीत नि वारेमाप दागिने घालण्यापेक्षा प्रसंग नि तुम्हाला साजेल अशा दागिन्यांची निवड केलीत, तर तुमचे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघेल.