शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

या 5 चुकींमुळे तुम्ही दिसताय वयस्कर!

फॅशनच्या काही चुकींमुळे तुम्ही वयस्कर तर दिसतं नाहीये ना. तुम्हाला फॅशनचा जास्त नाद नसला तरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने वय जरा जास्तच दिसू लागतं. म्हणून याची काळजी घ्या:

* सर्वात आधी तुमच्या वार्डरोबकडे बारकाईने पहा. कित्येक तरी ड्रेसेस असे सापडतील जे चलनात नाही आणि तरी ही तुम्ही ते वापरत आहात. घराबाहेर पडणार्‍यांना याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जुने कपडे अजूनही टाकण्यासारखे झाले नसले तरी ते वापरणे फॅशनच्या दृष्टीने अगदी आउटडेटेड ठरेल. ते कपडे टाकायची इच्छा नसली तरी त्यांना तात्पुरते रिजेक्ट करा आणि जर पुन्हा ती फॅशन आली की काढा. जीन्स किंवा वेस्टर्न कपडे निवडताना लेटेस्ट फॅशन काय आहे हे लक्षात असू द्या. कारण स्वत: ला आरामदायक म्हणून पॅर्टन रिपीट करणे चुकीचं ठरू शकतं.

* तुमची जुनी बॅग किंवा पर्स अजूनही चांगली असली तरी ती बदलून टाका. स्टॉकमध्ये नेहमी लेटेस्ट फॅशनच्या तीन ते चार बॅग्स असू द्यावा. अदलून-बदलून त्या वापरायला हव्या.


* सतत एक सारखी हेअर स्टाइलपण बोरिंग वाटते. प्रत्येक तीन महिन्यात ट्रीमिंग किंवा हेअर कटिंग करवा. याने तुम्हालाही फ्रेश वाटेल.



* फॅशनमध्ये अॅक्सेसरीजची महत्तवाची भूमिका असते. लेटेस्ट डिझायनची घड्याळ, ब्रेसलेट, कानातले यावर विशेष लक्ष द्यायला हवं. व इतर जे काही ट्रेडमध्ये आहे ते ही ट्राय करायला हरकत नाही.


* अता सर्वात शेवटलं पण महत्वाचं म्हणजे फुटविअर. काही लोकांना वाटतं असतं की पायाकडे कोण पाहणार आहे पण हा विचार चुकीचा आहे. ड्रेसप्रमाणे फुटविअर निवडा. वेस्टर्नवर जोडे, फ्लॅट मोजडी किंवा ब्लॉक हिल्स सँडल तर ट्रेडिशनलवर नाजुक चपला, ट्रेडिशनल मोजडी किंवा सँडल घालणे योग्य राहील.

अधून-मधून मार्केटमध्ये जाऊन ट्रेडमध्ये काय आहे याकडे लक्ष असू द्यावं. अपडेट राहणे गरजेचं आहे.