भरडभाजी
साहित्य : चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी, फोडणीचे साहित्य, कढीपत्ता, मीठ, हिरवी मिरची, तिखट, हळद, तेल, बेसन.
कृती : भरड भाजी तयार करण्यासाठी चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी सर्वप्रथम घ्याव्यात. त्या तव्यावर थोडसं तेल टाकून भाजून घ्याव्यात. त्यानंतर मिक्सरमधून अगदी बारीक न करता रव्यापेक्षा थोडे मोठे असतानाच ते मिक्सरमधून काढून घ्यावे. त्यानंतर फोडणीची तयारी करावी. सर्वप्रथम तेल, मोहरी, जीरे, कढीपत्ता, आवश्यकतेनुसार मीठ, हिरवी मिरची, आवश्यकता वाटल्यास लाल मिरची, हळद यांची फोडणी करावी. नंतर त्यात मिक्सरमधून अर्धवट काढलेल्या डाळी टाकाव्यात. या डाळी अधिक घट्ट होण्यासाठी बेसनपीठ वापरावेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून ते शिजेपर्यंत होऊ द्यावे. हा भरड भाजी घट्ट गोळा तयार झाल्यानंतर त्यावर हिरवी कोथिंबिर टाकावी. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही भरडभाजी खाण्यास वेगळीच मजा येते.