शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 25 फेब्रुवारी 2015 (11:31 IST)

मोघे, शिलेदार यांना ‘जीवनगौरव’

kirti shiledar
ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार व ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात २ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे.
 
संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शिलेदार यांना तर  मोघे यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारांचे वितरण सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत.