चोखंदळ व्यक्तिमत्व असणारी निवेदिता सराफ... साड्यांची आवड असणारी आसावरी

nivedita saraf
Last Updated: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (18:49 IST)
फोटो साभार- instagram @nivedita_ashok_saraf
सध्याचा काळात सर्व कलाकार निव्वळ अभिनयापुरतीच मर्यादित नसून वेग वेगळ्या गोष्टींमध्ये देखील आपला वेळ घालवत आहे. काही कलाकार मंडळींनी आप आपला व्यवसाय देखील सुरु केला आहे. आता हा व्यवसायाचा ट्रेंड सर्वत्र बघायला मिळत आहे. अभिनय करणारे अनेक कलाकार व्यवसाय सांभाळत आहे. आज आपण अश्याच एक चोखंदळ कलावंत असणाऱ्या आपल्या लाडक्या आसावरी ताई म्हणजेच निवेदिता सराफ यांचा बद्दल सांगत आहोत.

या केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्री नसून एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत. या स्वतःचा बिझिनेस करतात. अभिनयाव्यतिरिक्त काही वेगळं करावं असे नेहमीच त्यांना वाटायचे. त्यांनी सुरु केलेल्या बिझनेसचं नाव त्यांनी "हंसगामिनी" ठेवले आहे. मुळातच त्यांना साड्यांची फार आवड आहे. त्यांनी एकदा एका स्थानिक साडी कलाकाराला मदतीचा हात देण्यासाठी त्याच्या कडून सर्व साड्या विकत घेतल्या. त्या वेगवेगळ्या ठिकाणी साड्यांच्या एक्झिबिशन देखील भरवतात. आणि त्यांना त्याचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो.
निवेदिता ताईंचा जन्म 6 जून 1965 रोजी झाला आहे. त्यांचे पती अशोक सराफ हे देखील उत्कृष्ट कलाकार आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा वयात तब्ब्ल 18 वर्षाचे अंतर आहे. ज्या वेळी अशोक सराफ यांचा 'दोन्ही घरचा पाहुणा' हा सिनेमा प्रदर्शित झाला त्या वेळी निवेदिता ताई फक्त 6 वर्षाच्या होत्या. यांची पहिली भेट 'डार्लिंग डार्लिंग' या नाटकाच्या वेळी झाली होती. ही माझी छोटीशी मुलगी असे म्हणत निवेदिताच्या बाबानी त्यांची ओळख करून दिली. पुढे मग अशोक आणि निवेदितांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करताना त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात 'नवरी मिळे नवऱ्याला ' या सिनेमाच्या सेट वर पडले. 'धुमधडाक्या' च्या सेटवर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि पुढे लग्न करण्याचे ठरविले. गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी नावाच्या गावात मंगेशी देवळात जाऊन त्यांनी लग्न केलं.

लग्नानंतर त्यांचे अभिनयातील करियर उंचावर होते पण त्यांनी लग्नानंतर आणि मुलं झाल्यावर अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. आणि तब्बल 13 वर्षे अभिनयापासून दूर राहून मुलाचे संगोपन केले त्यांचा मुलाचे नाव अनिकेत आहे. त्यांनी आपल्या करियरला बाजूस ठेवून उत्कृष्टरित्या घराची आणि मुलाची जवाबदारी घेतली आणि पार पाडली.
मामला पोरीचा, धुम धडाका, नवरी मिळे नव-याला, बाळाचे बाप ब्रह्मचारी, तुझी माझी जमली जोडी, अशी ही बनवाबनवी, फेका फेकी, माझा छकुलासह या सारखे अनेक उत्तम आणि उत्कृष्ट चित्रपटांमध्ये अशोक सराफ आणि निवेदिता यांनी एकत्र काम केले. आणि ते आजतायगत करीत आहे. त्यांचा अश्या या उत्तम कारकिर्दीला मानाचा मुजरा.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कोकणातील निसर्गरम्य अंबोलीची सैर

कोकणातील निसर्गरम्य अंबोलीची सैर
कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती ...

साई बाबा मंदिर अजमेर

साई बाबा मंदिर अजमेर
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, म्हणाला - कोण म्हणतो मॉल बंद आहे
सोनू सूद कोरोना व्हायरसने पीडित लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल ...

नियम म्हणजे नियम

नियम म्हणजे नियम
वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते