अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि हर्षद आत्मारामचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न
ठिपक्यांची रांगोळी मधील अपूर्वा आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणून घरा घरात प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लग्नबंधनात अडकली आहे. ज्ञानदाने दीर्घकाळातील प्रियकर हर्षद यांचा सोबत सप्तपदी घेतले आहे. या दोघांचा विवाह सोहळा ८ मे रोजी पारंपरिक पद्धतीने पार पडला.
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी ज्ञानदा रामतीर्थकर आणि हर्षद आत्माराम यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
ज्ञानदा आणि हर्षदने अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या पेहरावातील साधेपणाने चाहत्यांची मने जिंकली आहे. त्यांचे केळवण, मेहंदी, संगीत आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. तसेच सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरला आपण 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील 'अपूर्वा' या भूमिकेमुळे घराघरात ओळखतो. हर्षद आणि ज्ञानदा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात धरला आहे.
Edited by-Dhanashri Naik
