1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
  4. Actress Sai Kalyankars Daughter's Naming Ceremony

सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई कल्याणकर हिने काही दिवसांपूर्वी गरोदर असल्याची बातमी शेयर केली होती त्यानंतर ती एका गोंडस मुलीची आई झाली आता अभिनेत्री सई कल्याणकर हिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण तिच्या घरी नुकतच तिच्या गोंडस मुलीचे बारसे झाले आहे व सईने सोशल मीडियावर तिच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केले आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सईने आपल्या मुलीचे नाव ‘नभा’ असे ठेवले असून या सोहळ्यातील काही फोटो पोस्ट केले आहे. तसेच या सोहळ्याला सईचे मराठी चित्रपटसृष्टीतील जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि कलाकारांनी सईवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री सईने डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. ठिपक्यांची रांगोळी या मराठी मालिकांमधून सई घराघरात पोहचली. सई आता आई म्हणून ती तिच्या आयुष्यातील या नवीन आणि सुंदर प्रवासाचा आनंद घेत आहे. लग्नाच्या चार वर्षांनंतर आई झाल्यामुळे तिच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी