अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच ''सा रे ग म प'' चे सूत्रसंचालन करणार! म्हणाला-दिग्गजांसोबत काम करणे माझ्यासाठी मोठा सन्मान
अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच एका नवीन शोचे सूत्रसंचालन करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार अभिनेता श्रेयस तळपदे 'सा रे ग म प'च्या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईत कार्यक्रमात श्रेयसने या लोकप्रिय संगीत रिॲलिटी शोचा भाग होण्याची आणि भारतीय संगीतातील मोठ्या नावांसोबत मंच शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल सांगितले. या संधीबद्दल आपला आनंद व्यक्त करताना श्रेयस म्हणाला, "'सा रे गा मा पा'चा भाग बनल्याबद्दल आणि या पर्वाचे सूत्रसंचालन करण्याची अद्भुत संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. शंकर महादेवन, जावेद अली, नीती मोहन आणि कुमार सानू यांसारख्या दिग्गजांसोबत काम करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे." शोच्या भव्यतेबद्दल बोलताना तो म्हणाला, "इतक्या मोठ्या शोची निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि येत्या काही आठवड्यांत तुम्हाला जी प्रतिभा पाहायला मिळेल ती जबरदस्त असेल. अशा मोठ्या आणि पूर्णपणे अस्सल संगीत शोचा भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो." शंकर महादेवन, कुमार सानू, नीती मोहन आणि जावेद अली या शोचा भाग असतील. "सा रे गा मा पा २०२६" चा प्रीमियर १९ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता झी टीव्ही आणि हिंदी झी ५ वर होईल.

