बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

चेकवरील 23 नंबरचा अर्थ काय

चेकचा वापर साधारणपणे सर्वच ठिकाणी केला जातो. चेकवरील रक्कम, सही, नाव तसेच चेक नंबरबाबत सर्वांनाच माहिती असते. मात्र चेकवरील त्या 23 डिजीट नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

* चेक नंबर- चेकवर सर्वात खाली दिलेल्या एकूण नंबर्सपैकी सुरूवातीचे सहा डिजीट म्हणजे चेक नंबर असतो. रेकॉर्ड ठेवण्यासाठी चेक नंबरचा उपयोग होतो.
 
* त्या पुढील 9 डिजीट हे एमआयसीआर कोड असतो. म्हणजेच या नंबरमुळे चेक कोणत्या बँकेतून जारी झालाय हे समजते. चेक रीडिंग मशीन हा कोड वाचू शकते. यातील पहिले तीन डिजीट हा शहराचा कोड असतो. त्यानंतरचे पुढील तीन डिजीट बँक कोड असतो. प्रत्येक बँकेचा एक युनिक कोड असतो आणि उरलेले डिजीट हे शाखेचा कोड असतो.
* बँक अकाउंट नंबर- पुढील सहा डिजीट नंबर हे बँक अकाउंट नंबर असतात. हा नंबर अनेक चेक बुक्समध्ये असतो. जुन्या चेकमध्ये हा नंबर नसेल.
 
* ट्रान्झॅक्शन आयडी- अखेरचे दोन डिजीट हे ट्रान्झॅक्शन आयडी असतात.