गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

ऑगस्टमध्ये या गमती पहायला विसरू नका

सध्या सुरू असलेल्या ऑगस्य महिना आकाश निरिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण काळ असून या महिन्यांत आकाशात अनेक खगोलीय चमत्कारीक घटना पहायला मिळणार आहेत. या घटना सर्वसामान्यांचे कुतूहल जाणवणार्‍या असणार आहेत. यामध्ये उल्का वर्षाव, शनि ग्रहाभोवतालचे कडे आणि इतर बरेच काही पहायला मिळणार आहे. मात्र, हे चमत्कार काही ठराविक तारखांना दिसणार आहेत. योग्य खगोलीय उपकरणांच्या सहाय्याने या गमती- जमती सहज पाहता येण्यासारख्या आहेत.
12 ऑगस्ट: उल्कापात
या दिवशी रात्रभर आकाशात उल्का पाताचा वर्षाव होणार आहे. खरे तर दरवर्षी जुलैच्या मध्यात ते ऑगस्ट महिन्यादरम्यान हा उल्कापात पहायला मिळतो. यावर्षी उल्कापाताची सर्वोच्च स्थिती ही 13 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही स्थिती पहायला मिळणार आहे. या रात्री आकाश निरिक्षकांना एका तासात 100 उल्कापात इतक्या मोठ्या प्रमाणात पाहता येणार आहेत.
 
16 ऑगस्ट: वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्र
वृषभ राशीतील नारंगी रंगाचा रोहिणी नक्षत्र या दिवशी प्रखरपणे दिसणार आहे. हा तार पृथ्वीपासून 65 प्रकाशवर्षे दूर आहे. या रात्री हा तारा चंद्राच्या वरच्या भागात दिसणार आहे. या तार्‍याला धार्मिक महत्त्व असल्याचे सांगण्यात येते. या तार्‍याला वृषभ अर्थात बैलाचा डोळा असे ही संबोधले जाते.
 
21 ऑगस्ट: सूर्यग्रहण
या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येणार असून चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने ठराविक ठिकाणी ठराविक काळासाठी सूर्य पृथ्वीवरून पूर्णत: दिसेनासा होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेच्या समुद्रकिनार्‍यावरील भागातून 99 वर्षांच्या काळानंतर मोठ्या प्रमरावर पहायला मिळणार आहे. जगातील इतर भागातून ते खंडग्रास स्वरूपात दिसेल. मात्र, तीन तासाचा हा खगोलीय चमत्कार भारतातून पाहता येणार नाही.