शनिवार, 18 ऑक्टोबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑगस्ट 2014 (15:11 IST)

पौर्णिमा आणि अमावास्येला का होतात अपघात ?

purnima
असं पाहण्यात आलं आहे की जास्तकरून अपघात अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी होतात? आपण जाणून घेऊ त्याचे रहस्य काय आहे - 
पौर्णिमा आणि अमावस्या तसं तर खगोलीय घटना आहे, पण ज्योतिषीप्रमाणे पौर्णिमाच्या दिवशी सुंदर दिसणारा आणि अमावास्यांच्या दिवशी रात्री लपणारा चंद्र अनिष्टकारी असतो. 
 
ज्योतिषी प्रमाणे अपघात आणि प्राकृतिक प्रकोपाची वेळ देखील हीच असते. चंद्रामुळे समुद्रात उठणार्‍या लाटा या गोष्टीचे प्रमाण आहे. अपघातांचे आकडे देखील याला प्रमाणित करतात. 

या संबंधाबाबत ज्योतिषाचार्य म्हणतात की चंद्र ग्रह मनुष्याला मानसिक ताण देण्यासोबत बर्‍याच वेळा गुन्हेगारीत कृत्य करण्यासाठी प्रेरित करतो. याच्या प्रकोपाने जेथे नैसर्गिक संकटे निर्मित होतात, तसेच गुन्हेगारीत घटनेत वाढ होते. 

मानव शरीरात 80 टक्के पाणी असल्याने मन आणि मस्तिष्कावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. हा प्रभाव पौर्णिमा आणि अमावास्यांच्या दिवशी अधिक दिसून येतो.
 
तसं बघितलं तर चंद्र हा सर्वात दुर्बळ ग्रह मानला जातो. याची गती हळू असते आणि अडीच दिवसात हा राशी बदल करतो. चंद्र मनुष्याला ताण तर देतोच तसेच अप्रिय घटनांशी देखील निगडित असतो. हेच कारण आहे की पौर्णिमा आणि अमावास्यांच्या दिवशी सर्वात जास्त अनिष्टकारी घटना घटतात. याचा एकच उपाय तो म्हणजे दान आणि पूजा. म्हणून पौर्णिमा व अमावास्यांच्या दिवशी विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.