शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 3 जानेवारी 2024 (15:07 IST)

2024 Upay पाच उपाय करुन पहा, संपूर्ण वर्ष शुभ जाणार

lal kitab
2024 Upay -  वर्ष 2024 प्रारंभ झाले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे संपूर्ण वर्ष शुभ रहावे, गेल्या वर्षी तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण व्हावी आणि सर्व क्षेत्रात तुम्हाला यश मिळावे आणि सोबत तुमची आर्थिक स्थिती पण मजबूत व्हावी तर यासाठी ज्योतिष शास्त्राचे हे पाच उपाय करुन पहा आणि तुमचे संपूर्ण वर्ष आनंदात घालवा.
 
1. सुगंधाचा वापर करणे - घरात तसेच बाहेर आणि शरीरावर सुगंधी द्रव्याचा वापर करणे. अंघोळीच्या पाण्यात अत्तर टाकून अंघोळ करणे. शनिग्रहाच्या शांतीसाठी तुम्ही कस्तूरी तसेच बडीशेपच्या सुगंधाचा वापर करावा. राहु आणि केतु ग्रहाच्या शांतीसाठी काळ्या गायीचे तूप तसेच कस्तूरी अत्तर वापरु शकतात. त्याच प्रमाणे तुम्ही घरात प्रत्येक दिवशी कापूर लावू शकतात. तसेच गूळ आणि तूप एकत्र करुन गोवर्‍यावर ठेऊन ते जाळू शकतात. आता आपण सहा सुगंध पहिली जसे की तूप, कस्तुरी, गुगूल, बडीशेप, कापूर, गूळ. जर का कस्तूरी मिळत नसेल तर केशरचा वापर करु शकतात. 

2. वर्षातून दोनवेळेस करा हा उपाय - वर्षामधे दोन वेळेस कुमारिका भोजन घालणे, गरिबांना काळे व पांढऱ्या रंगाचे ब्लँकेट दान करणे आणि दहा आंधळ्या माणसांना अन्नदान करणे. श्री हनुमान यांना शेंदूर चढवावे. तसेच कालिका देवीला चुनरी सोबत पूर्ण श्रृंगारचा सामान अर्पण करावे. वर्षातून दोन वेळेस शंभर गायींना हिरवा चारा खाऊ घालावा.
 
3. नारळाचे उपाय - वर्षातून दोन वेळेस पाण्याने भरलेला नारळ डोक्यावरून एकवीस वेळा ओवाळून त्याला बाहेर नेऊन त्याचा होम करा. 

4. कुलूपाचे उपाय - शुक्रवारी एक बंद कुलूप विकत घ्या. त्याच रात्री त्याला तुमच्या डोक्याखाली असलेल्या उशीखाली ठेवा आणि शनिवारी त्या बंद कुलूपाला चाबी सकट एखाद्या मंदिरात किंवा सार्वजानिक ठिकाणी ठेऊन या. कुलूप बंद असावे व त्याचे लॉक उघडू नये हे लक्षात ठेवावे. ज्या दिवशी ते कुलूप जे कोणी पण उघडेल, तर त्या कुलपाला उघडणारी व्यक्तीचे आणि तुमच्या नशीबाचे पण कुलूप उघडेल. 

5. गुरुवारचा उपास - संपूर्ण वर्षात गुरुवारचा विधिवत उपास ठेवावा तसेच कपाळावर केशर, हळद किवा चंदनाचा टिळा लावा.