मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (09:29 IST)

साडेसातीच्या दोषपूर्ण प्रभावाला कमी करण्यासाठी ज्योतिषीय सल्ला

साडे साती दरम्यान शनी ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि देवाची पूजा करणे सर्वात उत्तम उपाय आहे.
आपण साडेसातीच्या दोषपूर्ण प्रभावाला कमी करण्यासाठी ज्योतिषीय सल्ला घेतल्यानंतर नीलम सारखा रत्न धारण करु शकता.
दररोज हनुमान चालीसा पाठ करणे देखील योग्य ठरेल.
शनि ग्रह मंत्राला 80,000 वेळा सुशोभित करा.
उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. ही अंगठी घोड्याच्या नाळने तयार केलेली असावी.
"शिव पञ्चाक्षरि" आणि महा मृत्युंजय मंत्र जपत भगवान शिवाची पूजा करावी.
शनिवारी गरीबांना आणि गरजू लोकांना भोजन आणि वस्त्र दान करावे. काळा चणा, मोहरीचे तेल, लोखंडी सामान, काळे कपडे, घोंगडी, म्हशी, धन इतर वस्तूंचे दान करु शकता.
प्रत्येक शनिवारी तांबा आणि तिळाचे तेल शनिदेवाला अर्पित करावे.
दररोज "शनि स्तोत्र" पाठ करावा.
दररोज "शनि कवचम" उच्चारण करावं.
कावळ्यांना धान्य आणि बिया खाऊ घालाव्या.
काळ्या मुंग्यांना मध आणि साखर खाऊ घालावी.
भिकारी आणि शारीरिक रूपाने विकलांग लोकांना दही-भात दान करावं.
 
साडे साती दरम्यान हे कामं आवर्जून टाळावे-
साडे साती हा काळ म्हणजे मानवी मनावर नकारात्मक परिणाम होतो. साडे साती या अवस्थेत आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते पाहूया:-
 
कोणतेही जोखमीचे काम टाळावे.
घरात किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद टाळावेत.
गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे.
 
रात्री एकट्याने प्रवास करणे टाळावे.
 
आपण कोणत्याही औपचारिक किंवा कायदेशीर करारात अडकणे टाळले पाहिजे.
 
शनिवारी आणि मंगळवारी आपण दारू पिऊ नये.
 
शनिवार आणि मंगळवारी काळे कपडे किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.
कोणत्याही चुकीच्या किंवा अवैध कामात भागीदारी होऊ नये.
 
शनिला ज्योतिष शास्त्रात सर्वाधिक अनिष्टकारी ग्रह मानले गेले आहे. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. शनी आपल्या कार्य आणि कर्माच्या आधारावर न्याय करतात. जर आपले कर्म चांगले असतील तर निश्चित आपल्याला शुभ फल प्राप्त होतीत. आपल्या कर्माची फळे मिळण्यास उशिर होऊ शकतो परंतु फळ निश्चित प्राप्त होतं. साडे साती मानव जातीसाठी नेहमीच भय आणि उत्सुकतेचा विषय आहे. शनिची साडेसाती लोकांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकाराच्या काळाचे अनुभव देते.
 
शनि मूळात आपल्या धैर्याची परीक्षा घेत आपल्याला आपल्या कर्माचे फळ देतात. म्हणून आम्ही शनिला "न्यायधीश" मानतो.