मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (23:47 IST)

Astrology Tips: अशी झाडे लावल्याने प्रगतीची दारे उघडतात, ग्रह दोषही दूर होतील

Astrology Tips: हिंदू धर्मात देवी, देवता, नद्या, पर्वत, प्राणी, झाडे आणि वनस्पती या सर्वांची पूजा केली जाते. यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासोबतच  निसर्गप्रेमाची भावनाही दिसून येते. ज्योतिषशास्त्रात झाडे-वनस्पतींचा ग्रह आणि देवदेवतांशीही संबंध सांगितला आहे. आज आम्हीा तुम्हा्ला अशाच काही झाडांबद्दल सांगत आहोत, त्यांआची लागवड केल्या्ने घराचे सौंदर्य आणि वातावरण तर चांगलेच राहतील आणि कुंडलीतील ग्रहांशी संबंधित दोष दूर होतील व तुमची प्रगती होईल.  
1. शमी वनस्पती
शमीची वनस्पती धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते. घराच्या बाहेर दक्षिण आणि पूर्व-उत्तर कोनात लावता येते. शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिदोष दूर होतो. शनिदेव प्रसन्न होतात. याच्या पानांचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेसाठी केला जातो, ज्यामुळे महादेवाची कृपा देखील होते. ज्या घरात शमीचे रोप असते त्या घरात सुख, धन आणि धान्याची कमतरता नसते. विजयादशमीला शमीचे रोप लावणे खूप शुभ आहे.
2. रोझमेरी प्लांट
रोझमेरीचे रोप घराच्या नैऋत्य दिशेला लावावे. दररोज आंघोळीनंतर पाणी द्यावे. असे केल्याने कर्जाच्या संकटातून सुटका होते. जर तुम्हाला कोणत्याही कर्जामुळे त्रास होत असेल तर रोझमेरीचे रोप लावून त्याची सेवा करा.
3. पिंपळाचे झाड  
हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला मोठ्या श्रद्धेने पाहिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्यात सर्व देवदेवतांचा वास असतो. पिंपळाचे रोप कुंडीत लावता येते. पिंपळाच्या रोपाची पूजा करून जल अर्पण केल्याने शनिदेव आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच शनिदोष दूर होण्यास मदत होते.
4. लाजवंतीचे रोप  
लाजवंतीच्या रोपाचा संबंध राहू ग्रहाशी आहे. हे रोप घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे. कुंडलीतील राहू दोषाचा त्रास कमी होतो.
5. तुळशीचे रोप  
तुळशीच्या वनस्पतीत जितके औषधी गुणधर्म आहेत, तितक्याच पौराणिक समजुती आहेत. त्यामुळे प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप असते. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर कुंडीत लावा आणि पूर्व दिशेला ठेवा. सकाळी पूजा करा आणि रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते, आरोग्य चांगले राहते.