सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

आपल्या रुटीनने जाणून घ्या भविष्य, आपल्यासोबत काय घडणार माहीत पडेल

जेव्हाही काही अशुभ घटना घडते ते केवळ संयोग नसतं. अशुभ गोष्टींमागे भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत असतात. आमच्या दिनचर्येत अनेक अश्या गोष्टी घडत असतात ज्यावर लक्ष दिले तर कळून येईल की भविष्यात काय घडणार आहे ते.
 
जेव्हा अचानक घरातील घड्याळ वारंवार बंद पडू लागते किंवा घड्याळ्यातील काच फुटत असेल. किंवा खिडकीतील काच फुटत असतील तर समजावे की आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर गंभीर संकट येणार आहे.
 
दूध तापवताना वारंवार दूध ऊतु जाणे देखील अशुभ संकेत मानले गेले आहे.
 
जेव्हा स्वयंपाकघरातील ग्लास किंवा चिनी निर्मित भांडी फुटत असतील तर समजावे आर्थिक संकट येऊ शकतं.
 
कोणत्याही शुभ कार्याची योजना आखत असताना अडथळे निर्माण होत असतील तर समजावे की आपल्यावर विपत्ती येऊ शकते.
 
अचानक गच्ची किंवा अंगणात हाडाचा तुकडा येऊन पडल्यास अशुभ समाचार मिळण्याची शक्यता असते. किंवा घरातील सीलिंगचे प्लास्टर अचानक तुटणे, भिंतीत क्रेक येणे हे देखील अशुभ ठरू शकतं.
 
तसेच कुत्र्याचे भुंकणे सामान्य गोष्ट असू शकते परंतू दिवसा आकाशाकडे तोंड करून कुत्रा भुंकत असणे अशुभ ठरतं. याचा अर्थ भविष्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते.