मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावा

Mahamrityunjay Mantra In Hindi
शास्त्रांमध्ये भिन्न-भिन्न कार्यांसाठी भिन्न- भिन्न संख्यांमध्ये मंत्राचे जप करण्याचे विधान आहे. तसेच कोणत्या कार्यांसाठी महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावे याचा उल्लेख करण्यात आला आहे.
* भीतीपासून मुक्तीसाठी 1100 (अकराशे) वेळा जप केला जातो.
* रोगांपासून मुक्तीसाठी 11000 (अकरा हजार) वेळा जप केला जातो.
* पुत्र प्राप्तीसाठी, प्रगतीसाठी, अकाली मृत्यू टाळण्यासाठी सव्वा लाख या संख्येत मंत्र जपणे अनिवार्य आहे.
 
मंत्रानुष्ठानासाठी शास्त्रांप्रमाणे नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रत्येक कार्य शास्त्रसम्मत केले पाहिजे. यासाठी एखाद्या योग्य आणि विद्वान व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. जर साधक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने साधना करेल तर इच्छित फल प्राप्तीची शक्यता वाढते.