1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Budhwar Upay मिळेल बुद्धी- समृद्धीचा आशीर्वाद

budhwar
बुध ग्रहाला धन, वैभव आणि सुखाचे कारण मानले गेले आहे. बुध चंद्राचा पुत्र आहे आणि रोहिणी त्याची आई आहे. देवांच्या सभेत बुधला राजकुमार म्हटले आहे. त्यांना विद्वान आणि अथर्ववेदाचे ज्ञाता मानले आहे. त्यांचा विवाह वैवस्वत मनूची पुत्री इला यांच्याशी झाला. बुधाची दिशा उत्तर आहे आणि उत्तर दिशेला कुबेराचे स्थान मानले आहे. म्हणून बुधला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे उपाय अमलात आणले जाऊ शकतात:
 
 
दुर्गा देवीची आराधना करावी.
बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालायला हवं.
साबूत हिरव्या मुगाची डाळ दान करा. बुधवाराची मूग डाळ दान केल्याने कष्ट दूर होतात. म्हणून गरीब किंवा गरजू व्यक्तीला मूग दान करावे.
खोटे बोलू नका.
नाकात छिद्र करवावे.
मुलगी, सून, आत्या आणि सालीसोबत चांगले संबंध ठेवावे.
 
तसेच ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल किंवा नीच स्थितीत असेल त्यांनी बुध ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी बुध बीज मंत्र जपावा. या मंत्राचा जप 14 वेळा करावा.
 
'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय् नम:।।
 
या व्यतिरिक्त बुध साधना मंत्र देखील जपू शकता.
 
बुधवारचा दिवस बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि किन्नर देखील बुध ग्रहाशी संबंध ठेवतात म्हणून बुधवारी किन्नर दिसल्यास त्यांना वाईट साईट बोलून पळवणे योग्य नाही. त्यांना दान करावे. काही धन द्यावे. दरम्यान किन्नरने आनंदी होऊन आपल्याला त्यातून एक रुपयाचा शिक्का किंवा अजून काही दिलं तर ते पैसे आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये सांभाळून ठेवावे. याने आर्थिक प्रगती होती कारण त्याच्याकडून मिळालेला शिक्का शुभ ठरतो.
 
तसेच बुधदेवाची शुभता प्राप्तीसाठी या दिवशी महिलांना हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या. आणि वेलचीचे सेवन करावे.
 
बुध ग्रहाचे हे उपाय केल्याने व्यवसाय, बँकिंग, मोबाइल नेटवर्किंग किंवा इतर कार्यांशी संबंधित व्यक्तीच्या कामातील अडचणी दूर होतात. बुध देवाची कृपा मिळवून सर्व कार्य सिद्ध होतात. 
 
प्रत्येक व्यक्तीसाठी बुधदेवाची कृपा आणि शुभता आवश्यक आहे. म्हणूनच बुधवारी बुध संबंधित मंत्र जप, आणि उपाय करून धन, बुद्धी आणि व्यवसाय वृद्धीचा आशीर्वाद मिळवू शकता.