सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Gurvar Astro Tips : गुरुवारी हे 5 उपाय करून आपले भाग्य बदला

guruwar
जर पत्रिकेत गुरु ग्रह (बृहस्पती)शी निगडित कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते. बृहस्पती देवांचे  पण गुरु आहेत. गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचा कारक ग्रह आहे. येथे आम्ही गुरु ग्रहाच्या पूजेचे 5 उपाय, ज्यामुळे या ग्रहाचे दोष दूर करू शकता... 
 
1. गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत ठेवावे. ज्यात पिवळे वस्त्र परिधान करावे व बिन मिठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगांचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळे इत्यादी सामील करावे.  
2. बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजित करावे. यानंतर पंचोपचारद्वारे पूजा करावी. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल व प्रसादासाठी पिवळे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. आरती करावी.  
3. गुरु मंत्राच जप करावा - मंत्र- ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला हवी.  
4. गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबा (फळ) इत्यादी.  
5. महादेवाला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पित करावा.  
हे उपाय केल्याने धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य संबंधी सर्व अडचणी नक्कीच दूर होतात.