शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सोन्याची चेन किंवा अंगठी घालत असाल तर हे नक्की वाचा

सोन्याची चेन, अंगठी, बांगड्या, कडा घालणे अगदी सामान्य आहे. लोकं असे दागिने का घालतात? काय ते स्वत:ला श्रीमंत असल्याचे दाखवू इच्छित असतात की त्यांना ज्योतिष्याने असा सल्ला दिलेला असतो तर जाणून घ्या काय आहे यामागील मान्यता. हे आलेख मान्यता आणि जनश्रुतीवर आधारित आहे.
 
सोनं घालण्याचे ज्योतिष नियम-
1. आपलं लग्न मेष, कर्क, सिंह आणि धनू आहे तर आपल्यासाठी सोनं धारण करणे शुभ ठरेल.
 
2. वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ लग्न असणार्‍यांसाठी सोनं धारण करणे उत्तम नाही.
 
3. तूळ आणि मकर लग्न असणार्‍या लोकांनी सोनं जरा कमीच वापरावं.
 
4. वृश्‍चिक आणि मीन लग्न असणार्‍या लोकांसाठी सोनं घालणे मध्यम फलदायी ठरेल.
 
5. ज्यांच्या कुंडलीत बृहस्पती खराब असेल किंवा कोणत्याही प्रकारे दूषित असेल तर अशा लोकांनी सोनं वापरू नये.
 
6. पायात सोन्याचे जोडवी किंवा पैंजण घालू नये कारण सोनं अत्यंत पवित्र धातू आहे. बृहस्पतीची धातू असल्यामुळे पायात सोनं घातल्याने दांपत्य जीवनात समस्या येते.
 
7. सोनं धारण करून दारू आणि मांसाहाराचे सेवन करू नये. असे केल्याने आपल्याला समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. या पवित्र धातूचे पावित्र्य टिकवून ठेवावे.
 
8. गळ्यात सोनं घालणे म्हणजे आपला बृहस्पती ग्रह कुंडलीच्या लग्न भाव मध्ये बसेल आणि प्रभाव देईल.
 
9. हातात सोनं घालणे म्हणजे आपल्या पराक्रम अर्थात तिसर्‍या भाव मध्ये बृहस्पती सक्रिय भूमिकेत राहील.
 
10. लोखंड, कोळसा किंवा शनी संबंधी धातूचा व्यापार करणार्‍यांनी सोनं धारण करू नये.
 
11. ईशान किंवा नैरृत्य कोण मध्ये सोनं लाल कपड्यात गुंडाळून ठेवावे. याने बृहस्पतीला मंगळाची मदत मिळेल आणि समृद्धी वाढेल. 
 
12. सोन्याच्या दागिन्यासोबत खोटे दागिने किंवा लोखंड ठेवू नये. काही लोकं अशाने बृहस्पती अशुभ होऊन आपला शुभ प्रभाव सोडू लागतो.
 
आरोग्यासंबंधी मान्यता-
 
1. सोनं एक उष्ण धातू आहे आणि चांदी थंड. आपली तासीर काय हे जाणून घ्यावं लागेल आपली तासीर उष्ण असल्यास सोनं धारण करणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.
 
2. कंबरेत देखील सोनं धारण करू नये कारण याने पचन तंत्र बिघडतं. पोटाव्यतिरिक्त गर्भाशय, यूट्रस इतर संबंधी समस्या होऊ शकतात.
 
3. ज्या लोकांना पोट किंवा लठ्ठपणाची समस्या असेल त्यांनी सोनं धारण करू नये.
 
4. रागीट, अती बोलणारे आणि धैर्यवान नसणाऱ्या लोकांनी सोनं धारण करू नये.
 
5. गर्भवती आणि वृद्ध महिलांनी देखील सोनं धारण करू नये. कमी प्रमाणात सोनं घालायला हरकत नाही परंतू अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने घातल्याने समस्या येऊ शकतात.
 
6. झोपताना सोनं उशाशी ठेवू नये. याने निद्रा संबंधी समस्यांसह इतर समस्यांना तोंड द्यावं लागतं.
 
7. सर्दी खोकला किंवा श्वसन संबंधी आजार असल्यास कनिष्ठा या बोटात सोनं धारण करावे.
 
8. आपण दुबळे असाल तर सोनं घालावे.
 
9. सोनं धारण केल्याने गळा, कान, हात, पाय आणि छाती दुखणे यापासून मुक्ती मिळते.
 
10. सोनं डाव्या हातात धारण करू नये. अती आवश्यक असल्यास डाव्या हातात सोनं धारण करावे. कारण डाव्या हातात सोनं घातल्याने समस्या येतात.
 
इतर मान्यता-
* सोनं धारण केल्याने सन्मान आणि राज पक्षाहून मदत मिळते.
* एकाग्रतेसाठी इंडेक्स बोटात सोनं धारण करावं.
* दांपत्य जीवनात आनंदासाठी गळ्यात सोन्याची चेन घालावी.
* संतान प्राप्तीसाठी अनामिका बोटात सोनं धारण करावे.
* सोनं ऊर्जा आणि उष्णता प्रदान करतं आणि विष प्रभाव देखील नाहीसं करतं.
 
नोट- सोनं धारण करण्यापूर्वी ज्योतिष सल्ला घेणे योग्य ठरेल.