गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (22:55 IST)

2 नोव्हेंबरपासून या राशींचे चांगले दिवस होतील सुरू

राशी बदलाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होतो. 2 नोव्हेंबरला बुध कन्या राशीतून तूळ राशीत जाईल. यानंतर 21 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहील, नंतर बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात बुध हा प्रभावशाली ग्रह मानला जातो. त्याचा वाणी आणि बुद्धीवर परिणाम होतो, करिअरवरही परिणाम होतो. तूळ राशीत बुध ग्रहाच्या भ्रमणामुळे या 4 राशींना होईल फायदा-
 
 1. कर्क- कर्क राशीच्या लोकांना बुध बदलामुळे शुभ परिणाम मिळतील. या राशीत बुध चतुर्थ भावात राहील आणि तुम्हाला कौटुंबिक त्रासांपासून मुक्ती मिळेल. करिअरमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांनाही बुध बदलामुळे धन मिळू शकते.
2. कन्या- कन्या राशीच्या लोकांच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ होईल. या काळात बुध तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात राहील. बुधाच्या या गोचरमुळे आर्थिक समस्या दूर होऊन धनलाभ होण्याचे योग येतील.
3. मेष- 2 नोव्हेंबरला बुध तुला राशीत असल्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होईल. या काळात तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. आर्थिक लाभासोबत प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
4. मकर- गोचर काळात मकर राशीच्या लोकांची सर्व कामे होतील. बुध परिवर्तनामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक बाबतीत मात्र थोडे सावध राहावे लागेल.
5. आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.