1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (11:19 IST)

ग्रह नक्षत्रांचा संबंधांवर प्रभाव

grah nakshatra
ग्रह नक्षत्र आमच्या आपसातील संबंधांवर काय प्रभाव टाकतात, या बद्दल लाल पुस्कात बरेच काही दर्शवले आहे. लाल पुस्तकानुसार प्रत्येक ग्रह आमच्या नातलगांशी निगडित आहे अर्थात पत्रिकेतील ग्रह ज्या भावात असतील त्यानुसार आमच्या नातलगांची स्थिती स्पष्ट होते. 
 
1. सूर्य : वडील, काका आणि पूर्वज 
2. चंद्र : आई आणि मावशी 
3. मंगळ : बंधू आणि मित्र 
4. बुध : बहीण, आत्या, पुत्री, साळी आणि आजोळ पक्ष. 
5. गुरू : वडील, आजोबा, गुरू, देवता. 
6. शुक्र : पत्नी किंवा स्त्री. 
7. शनी : काका, मामा, सेवक आणि नोकर 
8. राहू : साळा आणि सासरे. तसं तर राहूला आजोबांचे प्रतिनिधित्व प्राप्त आहे. 
9. केतू : संतानं आणि मुलं. केतूला आजोबा (आईचे वडील) यांचे प्रतिनिधी मानले जाते 
 
असे समजले जाते की पत्रिकेतील प्रत्येक भाव कुणा न कुणा संबंधांचा प्रतिनिधित्व करतो व प्रत्येक ग्रह मानवीय नात्यांशी संबंध ठेवतो. जर पत्रिकेत एखादा ग्रह दुर्बळ असेल तर त्या ग्रहांशी संबंध असलेल्या नात्यांना मजबूत करून ग्रहाला बलवान करता येत. 
 
दुसरीकडे ग्रहांना बलवान बनवून संबंधांना प्रगाढ मजबूत करू शकता. तसेच नातलगांना आनंद देऊ शकता, जसे की बहिणीवर एखादे संकट आले असतील तर तुम्ही तुमच्या बुध ग्रहाला सुधारण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.