शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

असे वाचू शकता शनीच्या वाईट दृष्टीपासून

ज्योतिष शास्त्रात शनीला क्रूर ग्रहची पदवी मिळालेली आहे. ज्या व्यक्तीवर शनीची अशुभ दृष्टी असते त्यांना सर्व कामात अडचणींना सामोरा जावं लागतं. ज्योतिषमध्ये शनीला न्यायधीश देखील म्हटले गेले आहे अर्थात चांगला काम करणार्‍यांवर शनीदेव कृपा देखील करतात. तसेच ज्योतिष शास्त्र शनीची वाईट दृष्टी का पडते याचे कारण देखील दिले गेले आहेत. 
 
जी व्यक्ती धनाच्या बळावर गरीब आणि असमर्थ लोकांना त्रास देतात, अपमानित करतात त्यांच्या शनीची वाईट दृष्टी पडते. कारण शनी गरीब आणि असहाय लोकांचा प्रतिनिधी आहे.
 
जी व्यक्ती शनिवारी घरात लोखंडी सामान खरेदी करुन आणतात त्यांच्यावर शनीची वाईट दृष्टी पडते. याने दारिद्रय येतं म्हणून शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळावे. लोखंडी वस्तू दान करण्यास हरकत नाही.
 
शनिवारी शरीरावर तेल लावू नये. या दिवशी शनी देवाला तेल अर्पित करावे.
 
कोणत्याही दुसर्‍या व्यक्तीचे जोडे- चपला वापरु नये याने शनीची वाईट नजर पडेत.
 
घरी आलेल्या ब्राह्राण आणि गरीब व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवणार्‍यावर अशुभ प्रभाव दिसू लागतो.