शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (23:41 IST)

बुध ग्रहानंतर आता हे तिन्ही ग्रह करणार आहे राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांना फायदा होईल

ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या राशीमध्ये होणारा बदल महत्त्वपूर्ण मानला जातो. ग्रहांच्या राशीच्या बदलांचा सर्व राशींवर चांगला आणि अशुभ प्रभाव पडतो. जुलै महिन्यात बुधाचा राशी बदल 7 जुलै रोजी झाला आहे. या महिन्यात बुध पुन्हा एकदा राशी बदलेल. यावेळी बुध मिथुन राशीत आहे. बुध ग्रहानंतर या महिन्यात कोणते ग्रह आपली राशी बदलणार आहेत ते जाणून घ्या.
 
16 जुलै रोजी सूर्याचे राशी परिवर्तन  
सूर्य राशीचा बदल 16 जुलै 2021 रोजी होणार आहे. या दिवशी मिथुनपासून सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याचे कर्क राशीत प्रवेश वृषभ, कन्या, सिंह आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ राहील.
 
17 जुलै रोजी शुक्राचे राशी परिवर्तन  
शुक्र 17 जुलै 2021 रोजी राशी बदलणार आहे. शुक्र या दिवशी सिंहमध्ये प्रवेश करेल. सिंह, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. 
 
20 जुलै रोजी मंगळाचे राशी परिवर्तन  
20 जुलै, 2021 रोजी मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. मंगळ या दिवशी कर्क राशीत प्रवेश करेल. मिथुन, कन्या, तुला आणि मीन राशीच्या लोकांसाठी कर्क राशीत मंगळ प्रवेश शुभ होणार आहे.