सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (15:53 IST)

ज्योतिष विद्येच्या या 4 गोष्टी आपणास चकित करू शकतात

ज्योतिष एक महान शास्त्र आहे. कुठलेही ब्राह्मण पूर्णपणे ज्ञानी नाही तरी ही शास्त्रात अश्या काही गोष्टी आढळून येतात जे आपल्याला चकित करू शकतात. आम्ही आपल्यासाठी त्या 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो.
 
1 गुरुची दृष्टी पडल्यास अमृतवर्षा होते. या संदर्भात हे निश्चित करणे आवश्यक आहे की गुरु हे लग्न - त्रिकोणातील स्वामी आहे की तिहेरी स्थानांचा स्वामी. अष्टमेश किंवा मारकेश असल्याची चौकशी सुद्धा करायला हवी. गुरु लग्नेश त्रिकोणी असल्यावरच अमृताचा वर्षाव होईल नाही अन्यथा नाही. 
 
2 शनीच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की शनी महाराज ज्या स्थळी बसतात त्या स्थळाची वृद्धी करतात आणि आपली दृष्टी जेथे टाकतात त्या स्थानामध्ये बिघाड करतात. शनीच्या कुंडळीत कारक असल्यावर ते ज्या जागी विराजित होतात त्या स्थानाची वृद्धी करतात. आणि ज्या स्थळी ते बघतात आपला शुभ प्रभाव सोडतात. म्हणूनच, मान्यताच्या संदर्भात नेहमी एकच दृष्टिकोनावर अवलंबू नका. 
 
3 हातात शनी पर्वत दबलेले असल्यास व शनीचे बोट सूर्याच्या बोटाकडे वाकलेले असल्यास जीवनात शनीचे अडथळे हमखास दिसून येतात.
 
4 मंगळ ग्रह उत्साह आणि आनंद मिळवून देणारा ग्रह आहे. तसेच मंगळाची प्रवूत्ती भांडखोर असते. मंगळदोष असल्याचे त्यांचा या प्रवूत्ती मुळे मानले जाते कारण अती उत्साह आणि आनंद मिळविण्याची इच्छा गृहस्थ जीवनासाठी घातक असू शकते.