1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (15:35 IST)

Nature from the date of birth जन्मदिवसावरून जाणून घ्या स्वभाव

grah nakshatra
Know the nature from the date of birth
सोमवार
सोमवारी जन्मलेली व्यक्ती गोड बोलणारी व शांत स्वभावी असते. ही व्यक्ती मोठ्यांचे अनुकरण करणारी, उदार आणि व्यवहारज्ञानी असते.
मंगळवार
मंगळवारी जन्मलेली व्यक्ती वाचाळ, खोटं बोलणारी, तापट आणि भांडायला सदैव तत्पर असते. ही व्यक्ती शेतीच्या कामात रस घेणारी असते.
बुधवार
बुधवारी जन्मलेली व्यक्ती रूपवान असून शालजोडीतले मारणारी असते. ही व्यक्ती दुसर्‍यांचे गुण अवगुण पारखणारी, मस्करीत हुशार आणि व्यवसायात डोकं खुपसणारी असते.
गुरुवार
गुरुवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, अभ्यासू, मनमिळाऊ, आणि स्वत:च्या गुणांमुळे सगळ्यांकडून सन्मान मिळवणारी असते.
शुक्रवार
शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती कुरळ्या केसांची, आकर्षक राहणारी, मर्यादा राखणारी, आणि उच्च पदावर असते.
शनिवार
शनिवारी जन्मलेली व्यक्ती हुशार, बुद्धिवंत, कर्तृत्ववान, प्रेमळ असते. ही व्यक्ती सर्वांना आवडणारी असते.
रविवार
रविवारी जन्मलेली व्यक्ती मनस्वी असते. आवडीने निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात ही व्यक्ती यशस्वी होते. ही व्यक्ती बहादूर, उत्साही आणि दानशुर असते.