॥ श्री संत बाळूमामा आरती ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
आरती ओवाळू तुज कैवल्य धामा ॥ धृ ॥
धनगर कुलाचा उद्धार झाला ।
अवतरले संत अकोळ गावाला ।
बालपणी त्यानी चमत्कार केला ।
वस्तीचे दर्शन भोजन थाळीला ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
मेंढ्या राखिती उन्हातानात ।
मुक्या प्राण्यावर अपार प्रीत ।
नीतीने वागावे कमी नाही होत ।
उन्मत्ताला मामा शासन करीत ॥ २ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
गोसावी रूपात देवदूत आले ।
मामांचे त्यांनी सत्व पाहिले ।
अवघड विहिरीचे पाणी पाजता ।
आशीर्वाद देवी प्रसन्न होता ॥ ३ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
दीन दुबळ्यांना मामा राक्षिती ।
निपुत्रिकाला मामा संतान देती ।
कण्या रोगाल्या औषधी होती ।
भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
पृथ्वीतलावर मामांची सत्ता ।
देती वचन आपुल्या भक्ता ।
आदमापूर क्षेत्री समाधी घेता ।
स्वप्नी दर्शन भक्तांना देता ॥ ५ ॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
॥ बोला संत बाळूमामा महाराज की जय ॥