Festival Posters
✕

तळपायांवरून भविष्य

Updated: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (08:14 IST)


 
* पायावरील रेषा खंडित असणे किंवा तुटणे हे अनिष्ट लक्षण असून अशा प्रकारच्या रेषा असणारा माणूस वारंवार गोत्यात येतो. या लोकांचा स्वभाव चंचल असतो म्हणून यांची वृत्ती धरसोडीची असते.
 
* रेषांची जाळी असणे हे लक्षण अत्यंत अशुभ असतं.

* नागमोडी रेषा असणार्‍याच्या आयुष्यात अनेक फेरबदल व उलथापालथी होतात.


 
* रेषेवर चौकोन चिन्ह असल्यास त्याची फळे पदरी पडण्यास अनेक विघ्ने येतात.

* रेषेवर त्रिकोण चिन्ह असल्यास शुभफल तीव्र आणि प्रखर मिळतात. याने कीर्ती व ऐश्वर्यही प्राप्त होतं.


 
* अंगठ्याच्या टेकडीखालून पायाच्या आडव्या बाजूकडून उगम पावणारी रेषा प्रवासी रेषा असते. या रेषेची लांबी एक ते दीड इंच असल्यास त्या व्यक्तीला बराच महत्त्वाचा प्रवास करावा लागतो.  ही रेषा असणार्‍या माणसाचे उत्तरायुष्य स्थिर स्वरूपाचे व भरभराटीचे जाते.

* पायाच्या खोटेवर चंद्राकृती असणारी रेषा फारच क्वचित आढळते. ही रेषा एक ते दीड इंच लांबीची असते. या रेषेमुळे माणूस जगात अद्वितीय व लोकोत्तर ठरतो. मात्र चंचल वृत्ती, व्यभिचारी, कामवासना व दुर्गुणांमुळे या माणसाच्या प्रगतीत बर्‍याच अडचणी निर्माण होतात.



 
* पायाच्या आडव्या बाजूकडून निर्माण होऊन रेषा तळपायाच्या खोलगट भागामध्ये तळपायाच्या मधोमध करंगळीच्या दिशेने जाते. दोन इंचापर्यंत लांबी असलेली ही रेषा असणारे व्यक्ती अतिशय चळवळे असून ध्येयनिष्ठ असतात. आपल्या चिरस्मरणीय कामगिरीमुळे मृत्यूनंतरही त्यांचे स्मरण चिरकालापर्यंत केले जाते.

* तळव्याच्या मध्याच्या आडव्या बाजूने निर्माण होऊन दोन इंचापर्यंत अंगठ्याच्या दिशेने जाणारी रेषा पुरुषोत्तम रेषा म्हणून ओळखली जाते. ही रेषा असणार्‍या व्यक्तीची आर्थिक स्थिती प्रारंभी बेताची असली तरी ती व्यक्ती स्वकर्तृत्वाने आपले नशीब काढते व धनाढ्य बनते. ही व्यक्ती शांत, उदार, धार्मिक, सद्गुणी असते.


 
* अंगठ्याच्या कोपर्‍यातून उगम पावून अंगठ्याच्या उंचवट्यावरून थोडी पुढे जाणारी रेषा म्हणजे माया रेषा. ही रेषा कोणत्याही मार्गाने मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देते.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दिवाळीत देवदर्शन आणि पर्यटन एकत्र करायचे? नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सहलीचे नियोजन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

नरक चतुर्दशीला काय करावे आणि काय करू नये? महत्त्वाचे नियम जाणून घ्या

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments