रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सावध राहा! प्रेमात या राशीचे लोकं देतात धोका

ज्योतिषप्रमाणे 12 मधून सहा राशी अश्या आहेत ज्या प्रेमात धोका देण्यात आणि हार्ट ब्रेक करण्यात पुढे असतात. हे आपल्या पार्टनर्सला धोक्यात ठेवतात पण याच अर्थ असा नाही की ही राशी असलेला प्रत्येक व्यक्ती असाच असेल. त्यातून काही इमानदार आणि चांगल्या प्रवृत्तीचे असतात. हा फक्त अनुमान आहे यावरून लोकांचे आकलन करणे योग्य नाही.

 
मेष
सर्वांचे आकर्षण बनण्यासाठी तत्पर या राशीच्या लोकांचा व्यवहार आवेगपूर्ण असतो. हे कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करत नाही. यांना आत्मनिर्भर राहायचे असतं. हे दुसर्‍याच्या नियंत्रणात राहणारे नसतात. यांना एडवेंचर आणि परिवर्तन आवडतं. मेष राशीचा पार्टनर असल्यास सतत त्यासोबत नावीन्याने वागावे म्हणजे नात्यात कंटाळ येणार नाही.
 
मिथुन
या राशीचे लोकं जिज्ञासू प्रवृत्तीचे आणि मौज करणारे असतात. ते दुसर्‍यांवर आपला प्रभाव सोडण्यात तज्ज्ञ असतात. ते सहजंच कोणालाही मूर्ख बनवतात. प्रेमात यांना शारीरिक आणि भावनात्मक साथ हवी असते.
 
सिंह
या राशीचे लोकं चांगले पार्टनर सिद्ध होतात. हे प्रेमात पर्फेक्ट असतात आणि नाटक करण्यातही. पार्टनरसोबत खूश नसल्यास सहज रिलेशनमधून बाहेर पडतात. आपला पार्टनर या राशीचा असल्यास त्याची रोज स्तुती करावी लागणार तरच तो खूश राहील.

धनू
या राशीचे लोकं सभ्य दिसतात पण यांना मूर्ख बनवणे सोपे नाही. आपल्या पार्टनरबद्दल सर्व जाणून घेणे आणि एडवेंचरस बनणे यांना आवडतं. या राशीच्या लोकांचे विवाहबाहय संबंध असणे अगदी सामान्य आहे. धून राशीचा पार्टनर असल्यास त्याला स्पेस द्या.
 
कुंभ
या राशीसाठी रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. हे लपून सर्व कामं करतात परंतू पकडले गेले तरी भीत नाही. तरीही हे लोकं इमानदार असतात.
 
मीन
या राशीचे लोकं खूप स्वार्थी असतात. यांच्यासाठी स्वत:च्या भावना अती महत्त्वाच्या असतात. यांच्या आपल्या पार्टनर्सकडून खूप अपेक्षा असतात ज्यामुळे त्रास उद्भवू शकतो. यांना संयमाने राहण्याची गरज असते.