सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (14:28 IST)

7 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांनी सावध राहावे, शुक्र राशी परिवर्तनचा प्रभाव Shukra Rashi Parivartan 2022

shukra grah
Shukra Rashi Parivartan 2022 ज्योतिषशास्त्रात राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. शुक्र हा ऐश्वर्य, सौभाग्य, वैभव आणि सुखाचा कारक मानला जातो. 13 जुलै रोजी सकाळी 10:50 वाजता शुक्र ग्रहाने वृषभ राशीतून निघून मिथुन राशीत प्रवेश केला आहे. 7 ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहील. या काळात शुक्र परिवर्तनामुळे काही राशींना अशुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घ्या या राशींबद्दल-
 
कर्क- कर्क राशीत शुक्राचे गोचर बाराव्या घरात होत आहे. हे संक्रमण तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी शुभ नाही. या काळात तुमचे खर्च वाढू शकतात.

कन्या- कन्या राशीच्या दहाव्या भावात शुक्राचे भ्रमण आहे. या काळात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळू शकतात. या काळात शत्रूंपासून सावध राहावे लागेल.
 
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या आठव्या भावात शुक्राचे भ्रमण आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ मानले जात नाही. तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. खर्च वाढू शकतो.
 
धनु- धनु राशीच्या सातव्या घरात शुक्राचे भ्रमण आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
मकर - शुक्र मकर राशीतील सहाव्या भावात भ्रमण करत आहे. या काळात तुमच्या प्रेम-संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्या.
 
कुंभ- कुंभ राशीच्या पाचव्या भावात शुक्राचे भ्रमण आहे. तथापि, मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
मीन - मीन राशीच्या चौथ्या घरात शुक्राचे भ्रमण आहे. या कालावधीत गुंतवणूक करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कर्ज घेण्याची शक्यता आहे.