तीन राशींवर शनीच्या साडेसातीचा आणि दोन वर ढय्या, जरूर करा हे 7 उपाय
ज्योतिष शास्त्रात शनी ग्रहाचा विशेष महत्त्व आहे. या ग्रहाला सर्वात मारक ग्रह असे म्हणतात. पत्रिकेत अशुभ शनी असल्यास व्यक्तीला बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
शनी एका वेळेस 5 राशींवर आपला सरळ प्रभाव टाकतो. एका वेळेस तीन राशींवर शनीची साडेसाती आणि दोन इतर राशींवर ढय्या जरूर राहतो. शनी एका राशीत किमान अडीच वर्ष राहतो.
या वेळेस शनी धनू राशीत आहे. या मुळे वृश्चिक, धनू आणि मकर राशीवर शनीची साडेसाती आहे. जेव्हा की वृषभ आणि कन्या राशीवर शनीच्या ढय्येचा प्रभाव आहे.
शनी दोष कमी करण्याचे उपाय
- शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी तेल चढवायला पाहिजे आणि पिंपळाच्या झाडाची खास करून पूजा करायला पाहिजे.
शनिवारी काळ्या तिळाचे दान, शमीच्या झाडाची पूजा आणि चामड्यांचे जोडे चपल्यांचे दान करणे देखील शुभ मानले जाते.
शनिदेव त्या लोकांना शुभ फल प्रदान करतो जे मेहनती आणि गरिबांना भोजन करवतात. जो व्यक्ती गरिबांचा अपमान करतो त्या व्यक्तीवर शनी कधीही त्याची कृपादृष्टी ठेवत नाही.
शमीच्या वृक्षाची जड काळ्या कपड्यात ठेवून शनीवारी संध्याकाळी उजव्या हातात बांधावी तथा ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम: मंत्राचा जप करावा.
पत्रिकेत शनीशी निगडित दोष दूर करण्यासाठी सुंदरकांडचा पाठ करावा आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन गोडाचा प्रसाद अर्पित करावा.
शनीच्या प्रकोपाला शांत करण्यासाठी हा मंत्र फार प्रभावी आहे. शनीला समर्पित या मंत्राला श्रद्धाने जप केल्याने निश्चित रूपेण त्याचा फायदा होईल.
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:।
मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:।।
शनीशी निगडित दोष दूर करण्यासाठी किंवा त्यांची कृपा मिळवण्यासाठी महादेवाची उपासना एक सिद्ध उपाय आहे.