शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (09:19 IST)

मूलांक 8 म्हणजे स्वभावाने गंभीर

मूलांक ८ हा एकाकी आणि स्वतत मशगूल राहणारा म्हणजे दुसऱ्यांवर प्रकट न होणारा अंक आहे. त्याला भौतिकवादी समाजाकडून स्वतची उपेक्षा झाल्याची तक्रार असते. मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचे तांत्रिक ज्ञान हे सर्वसाधारण लोकांपेक्षा अधिक असते. त्यांना प्रत्येक विषयाची थोडीफार माहिती असते. या व्यक्ती स्वतच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करु शकत नाहीत. त्यामुळे अडचणीच्या वेळी त्यांना सहानुभूती मिळत नाही. 
 
स्वभाव-  मूलांक ८चा स्वभाव सामान्यत: गंभीर असतो. हे लोक बाहेरुन शांत दिसत असले तरी त्यांच्या मनात वैचारिक घुसळण सुरूच असते. परतुं विषयाची मांडणी करताना ते विषयापासून दूर जातात. इतरांना मदत करायला ते तयार असतात, परंतु इतरांनी त्यांना मदत न केल्याची त्यांची तक्रार असते. उच्चपदस्थ व्यक्तीसमोर हे लोक सहज मान झुकवतात.
 
व्यक्तिमत्व- मूलांक ८ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व उदार, गंभीर आणि रहस्यमय असते. ते निर्भीड असतात. ते उत्साही, सक्रिय आणि स्पष्टवक्ते असतात. अनेकदा ते आश्चर्यकारक कामं करुन जातात. अनेकदा या व्यक्ती उदास दिसतात. वेगवान प्रगती करण्याची भावना यांच्या मनात खदखदत असते. त्यांना घाई असते. पण अपयश आल्यास ते स्वतला दोष न देता इतरांना आपल्या भाग्याचे दोषी ठरवतात. भौतिक समृध्दी व सफलता यांबाबत मूलांक ८ हा सर्वाधिक अपयशी अंक मानला जातो. परंतु आध्यात्मिक उत्कर्षांसाठी हा अंक यशस्वी ठरतो. 
 
गुण- या व्यक्तींमध्ये बुध्दिमत्ता, गंभीरपणा, भावुकता, दूदर्शीपणा यांसारखे गुण असतात. स्वाभिमान तर यांच्यात सहज असतोच. ते उत्साही, सतत सक्रीय राहणारे आणि स्पष्टवक्ते असतात. 
 
अवगुण- या व्यक्तींना त्यांच्यावर झालेली निष्पक्ष टीका ऐकवत नाही. थोडय़ाशा विरोधानेही हे लोक विचलित होतात. यांच्याकडे झालेल्या दूर्लक्षामुळे त्यांना खूप त्रास होतो. घाई गडबडीत हे लोक चुकीचा निर्णय घेऊन बसतात, आणि त्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. 
 
शुभ तिथी- प्रत्येक महिन्याची २, ४, ८, ११, १३, १७, २०, २२ आणि २६ तारीख मूलांक ८ असलेल्या लोकांसाठी शुभ असतात.
 
शुभ दिवस- शनिवार हा तुमच्यासाठी सर्वाधिक अनुकूल दिवस आहे. बुधवार आणि शुक्रवारही तुमच्यासाठी शुभ ठरतील. 
संबंधांसाठी शुभ मूलांक- मूलांक ८ असलेल्या लोकांचे मूलांक ४ असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य चांगले असते. मूलांक २च्या व्यक्तीही त्यांच्यासाठी सफल ठरतात. मात्र मूलांक १, ३ व ९ पासून यांनी दूर राहिलेले चांगले. 
 
शुभ रंग- निळा, सफेद, राखाडी, हिरवा आणि वांगी रंग तुमच्यासाठी शुभ आहेत. 
 
शुभ वर्षे- ४, ८, १३, १७, २२, २६, ३१, ३५, ४०, ४४, ५३, ६२ आणि ६७वे वर्ष आपल्याला अनुकूल आहे. 
 
भाग्य रत्न- नीलमणी म्हणजे नीलम तुमच्यासाठी सर्वाधिक शुभ आहे. त्याला चांदीच्या अंगठीत ठेऊन शनिवारच्या दिवशी मधल्या बोटात घालणे शुभ ठरेल. 
 
कल्याणकारी देव- शनि, हनुमान आणि शंकराची उपासना केल्यास विशेष लाभ होईल. 
 
कल्याणकारी मंत्र- 
ॐ श्रीं शं शनैश्चराय श्रीं नम:
ॐ ह्रौं जूं स:
ॐ हं हनुमंते नम:
 
भाग्योदयकारी उपाय-संकटांपासून बचाव करण्यासाठी दर शनिवारी तेलाच्या दिव्यामध्ये स्वतचे प्रतिबिंब बघून तो दिवा देवळात लावा. तसंच दर शनिवारी लोखंडाच्या वस्तू, तेल, चामडय़ाच्या वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे दान करा. मानसिक ताण आणि कठीण परीस्थितीच्या निवारणासाठी दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्यास लाभदायक ठरेल.